Home मूल ‘त्या’च्या मुळेच तिची आत्महत्या!
व-हाड दूत न्युज नेटवर्क
मुंबई: बीड जिल्ह्यातील पुजा चव्हाण 22 वर्षीय तरुणीने पुण्याच्या वानवडीत आत्महत्या केलीये. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत तिने आपलं आयुष्य संपवलं. रविवारी (7 फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली. पुजा चव्हाण असं या तरुणीचं नाव आहे. पुजा मुळची बीडमधील परळीची रहिवासी होती. ती मागील महिन्यातच पुण्यात आली होती.
पुजा चव्हाण तिचा चुलत भाऊ आणि एका मित्रासोबत पुण्यात राहत होती. तिचं बीएचं शिक्षण पूर्ण झालं होतं. पुण्यात ती स्पोकन इंग्लिशच्या कोर्ससाठी आली होती. यानंतर पुण्यात येऊन दोनच आठवडे होत नाहीत तोच तिने हे टोकाचं पाऊल उचललं. तिने राहत असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. तिच्या डोक्याला आणि मनक्याला गंभीर दुखापत झाली होती. या युवतीचे विदर्भातील एका मंत्र्यासोबत संबध असल्याची चर्चा आहे. तीच्यामुळेच तिने आत्महत्या केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
© All Rights Reserved