खामगाव: दोन दिवसांपूर्वी येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना १७ सप्टेंबररोजी रात्री ८ वाजता उघडकीस आली.
खामगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील बद्रीनाथ जगन्नाथ वाघोडे (वय ५२) यांना कोरोनाची लक्षणे आढळल्याने भरती करण्यात आले होते. काही महिन्यापूर्वी त्यांच्या मेंदूची नस चोकअप झाल्याने त्यांच्यावर वर्धा येथे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. बद्रीनाथ वाघोडे यांच्यावर विदर्भ ग्रामिण कोकण बँकेचे कर्ज असल्याचे गावकºयांनी सांगितले.