करवंड येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 4 बालक जखमी

0
264

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

बुलडाणा :रस्त्यावर खेळणा-या चार बालकांवर हल्ला करून पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांना जखमी केल्याची घटना 9 फेब्रुवारी रोजी दुपारी ग्राम करवंड येथे घडली. जखमी बालकांवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच आहे. नागरिकांवर हल्ले करत आहेत. 8 रोजी बुलडाणा तालुक्यातील ग्राम देऊळघाट येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने 4 बालक व  काही लोकांना जखमी केले. तसेच, चिखली तालुक्यातील ग्राम करवंड येथे  एका पिसाळलेल्या कुत्र्याने चार मुलांना  चावा घेतला.  या घटनेत निशा सागर गवई (5),शेख असद शेख अन्वर (9), पूर्वा सुनील फाटे (11) व कार्तिक समाधान तारगे (6) जखमी झाले आहे. गावात या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पिसाळलेल्या कुत्र्याला ठार केले. शहरासह ग्रामपातळीवर वाढत असलेले पिसाळलेल्या कुत्र्यांची हल्ले थांबून या कुत्र्यांचा कायम बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांकडून होत आहे.

Previous article*सुहास तेल्हारकर या युवा शेतकर्‍याने केली काळ्या गव्हाची लागवड*
Next articleपोलिस पाटलाने झाडली बालकावर गोळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here