बनावट दस्तऐवज बनवून भूखंड खरेदीकरणाऱ्या पाच लोकांविरुद्ध गुन्हा दाखल..

0
358

बनावट दस्त बनवून भूखंड खरेदी करणाऱ्या पाच लोकांविरुद्ध नायब तहसीलदार यांच्या फिर्यादीवरून चिखली पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल..

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
चिखली : उपविभागीय अधिकारी बुलढाणा या न्यायालयाचे पदनाम, बनावट शिक्का वापरून खोट्या स्वाक्षरीच्या साह्याने कार्यालयीन बनावट दस्त तयार करून नोंदणीकृत दस्ताद्वारे व्यवहार पूर्ण करण्यात आले असून शासकीय दस्तऐवज बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पाच लोकांविरुद्ध चिखलीचे निवासी नायब तहसीलदार एच.डी. वीर यांच्या फिर्यादीवरून चिखली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दिनांक ६ फेब्रुवारी २०२१ रोजी चिखली पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, तालुक्यातील दिवठाणा येथील गट नं. ६८ मधील ०.४७ हे.आर जमिनिपैकी ०.०२ हे.आर जमीन गोठ्याकरिता प्रणिता सुमंता मोरे, लिहून घेणार व तेजराव कोंडू मोरे, लिहून देणार दोघेही रा. दिवठाणा यांनी दस्त क्रमांक ३११४/२०२० दिनांक २३/०७/२०२० सोबत उपविभागीय अधिकारी बुलढाणा यांचे कार्यालयीन बनावट दस्त / आदेश क्रमांक आरटीएस.५९/४६/२०२० दिनांक १६/०६/२०२० सादर करून नोंदणीकृत दस्ताद्वारे व्यवहार केला, तसेच मौजे दिवठाणा तालुका चिखली येथील गट नंबर ६८ मधील ०.४७ हे.आर जमिनिपैकी ०.०१ हे.आर धनंजय नामदेव मोरे लिहून घेणार व तेजराव कोंडू मोरे, लिहून देणार, दोघेही रा. दिवठाणा यांनी सुद्धा दस्त क्रमांक ३११३/२०२० दिनांक २३/७/२०२० सोबत उपविभागीय अधिकारी बुलढाणा यांचे कार्यालयीन बनावट दस्त / आदेश क्रमांक आरटीएस. ५९/४४/२०२० दिनांक १६/६/२०२० सादर करून नोंदणीकृत दस्ताद्वारे व्यवहार केला.
सदर प्रकरणी निवासी नायब तहसीलदार चिखली यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या समितीने केलेल्या सखोल चौकशीत हे बनावट दस्त तयार करण्यासाठी त्यांना नितीन वसंतराव मेहेत्रे आणि प्रल्हाद जाधव दोघेही रा. चिखली यांनी मदत केली. सदर परवानगी आदेश हा उपविभागीय अधिकारी बुलढाणा या पदनाम, बनावट शिक्का वापरून गैरव्यवहार केलेला आहे तसेच सदर बनावट परवानगी आदेशावरील स्वाक्षरी ही उपविभागीय अधिकारी बुलढाणा यांची नसल्याची माहिती समोर आली आहे. बनावट दस्तऐवजाच्या आधारे अनुषंगिक लाभ मिळण्याच्या उद्देशाने नोंदणीकृत खरेदी दस्त करून घेणार व देणार तसेच बनावट शासकीय दस्तऐवज बनविणे हा फौजदारी संगनमताने हा गैरप्रकार केल्याचे सिद्ध होत असल्यामुळे बनावट शासकीय दस्तऐवज बनविणे हा फौजदारी गुन्हा ठरतो त्यामुळे वरील सर्व नमूद इसमांची विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांचे संदर्भ पत्रान्वये निवासी नायब तहसीलदार यांना गुन्हा नोंदवण्यासाठी प्रदूषित करण्यात आले होते सदर प्रकरणी अनुषंगिक लाभ मिळण्याच्या उद्देशाने खरेदी दस्त करून घेणार व देणार व त्यांना या कामात मदत करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा तसेच बनावट दस्त बनावट शिक्का व बनावट सही तयार करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी आशयाची तक्रार निवासी नायब तहसीलदार यांनी केली आहे.
सदर फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी प्रणिता सुमंता मोरे, तेजराव कोंडू मोरे, धनंजय नामदेव मोरे, नितीन वसंतराव मेहेत्रे व अमोल प्रल्हाद जाधव या पाच लोकांविरुद्ध भा.दं.सं. १८६० नुसार कलम ४६८, ४७१, ४७३, ४७६, ३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून बातमी लिहिपर्यंत सदर प्रकरणात सुरू असलेली पुढील कारवाही बद्दल माहिती प्राप्त झालेली नाही.

Previous article“हे ” आहेत नांदुरा तालुक्यातील 15 गावांचे सरपंच व उपसरपंच
Next articleएका महिन्यातअपघातांमध्ये दहा ते पंधरा जणांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here