वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : आई वडील मरण पावल्याने पीडित मुलगी ही मामा कडे राहात होती परंतु तिथे चुलत मामानेच तिचा विनयभंग केल्याची घटना सिंदखेदराजा तालुक्यातील दुसरबीड येथे घडली आहे. पीडित मुलगी ही 25 जानेवारीला घरात एकटीच असताना चुलत मामाने येऊन तिचा विनयभंग केला व कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.