वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाना : मोताळा आणि शेगाव तालुक्यात बर्ड फ्लूने एन्ट्री केली असून तिथे घेण्यात आलेल्या नमुन्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. व हा अहवाल पौझिटिव्ह आला असून दोनीहि तालुक्यातील संसर्ग परिसर हा निगरानी क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
मोताळा तालुक्यातील सारोळापिर येथील दयासागर डोंगरे व शेगाव तालुक्यातील भोलपुरा येथील शुभम राजगुरे यांच्या कडील कोंबड्या 8 दिवसांपूर्वी मृत झाल्या होत्या. भोपाल प्रयोगशाळेतील या कोंबड्यांचे अहवाल हे पौझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.त्यामुळे संसर्ग क्षेत्रापासून 1 कीमीचा परिसर हा बाधित परिसर म्हणून तर 2 किमीचा परिसर हा निगरणी क्षेत्र म्हणून घोषित करण्याच्या मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी आज केली आहे.