खबरदार, पशुसंवर्धन विकास महामंडळाचे कार्यालय हलवले तर! भाजपाचा इशारा

0
342
भाजपा कार्यकर्त्यांनी अडवला सामानाचा ट्रक 
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: महाविकास आघाडी सरकारने पशुसंवर्धन विकास महामंडळाचे कार्यालय नागपूरला हलवण्याचा घाट घातला आहे. आज रविवारचा दिवस असल्यानंतरही ट्रकद्वारे सामान नेण्यात येत होते. भाजपा कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहचून ट्रक थांबवत सामान नेवू देणार नाही असा इशारा दिला. हा सर्व प्रकार निषेधार्थ असल्याची प्रतिक्रिया भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी दिली आहे.
देशाच्या स्वतंत्र काळानंतर राज्यांच्या स्थानिक विकासासाठी प्राधान्य जे अनेक करार केले त्या वेळी अकोला करार करत असताना सरकारने अकोल्याचा विकास करू अशी ग्वाही दिली होती, परंतु अकोला शहरात असलेले सरकारी कार्यालय अकोला येथुन  हलविण्याचे महापाप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकार करत आहे, आज  अकोल्यात राष्ट्रवादीचे पक्षाचे मंत्री असताना अकोला शहरात सन 2002 पासून कार्यरत असलेलं पशुसंवर्धन विकास महामंडळ कार्यालय हलवण्याचा निर्णय शासनाने आकस्मिक पणे घेतला आणि सोबतच दोनच दिवसात कार्यालयातील  सामान तातडीने हलविण्याचे महापाप महा विकास आघाडी करीत आहे.
या कृतीचा अकोला भारतीय जनता पक्षाने जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक जुने आरटीओ रोड गोरक्षण रोड येथे कार्यालयाला टाळे ठोकून जोरदार निदर्शने करून शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त जिल्हा भाजपा माजी अध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी केले तसेच राज्य शासनाचा कुटिल डाव हाणुन पाडला.
आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना व जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर भाऊ सावरकर यांना माहिती मिळाल्यानंतर पशुसंवर्धन विकास महामंडळातील कार्यालयाचा सामान हलवण्याचा प्रयत्न सुरू असताना रविवारी सुट्टी असताना सुद्धा हा प्रकार व तातडीने सामान हलवण्याची  घाई का असा सवाल जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार सावरकर यांनी उपस्थित करून त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सरकारचा हा प्रकाराचा  निषेध करण्याचा निर्देश दिला, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ताबडतोब तिथे उपस्थित असलेले ट्रक न हलवण्यास भाग पाडून व काला ठोको आंदोलन प्रदेश भाजपा कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात यांच्या नेतृत्वात केला यावेळी गिरीश जोशी मनीराम टाले, माधव मानकर, एडवोकेट देवाशीष काकड, संतोष पांडे, गणेश अंधारे , मनोज शाहू, अजय शर्मा, विजय इंगळे, बाळ टाले ,प्रशांत अवचार, आकाश ठाकरे, अभिजीत कडू , देवेंद्र तिवारी , डॉक्टर गौरव शर्मा,  बन्सी चव्हाण, विकी ठाकूर, गणेश सपकाळ, राजे शिंदे, मनिष बाचोका, मनिष बुंदिले, मंगेश सावंग, रणजीत खेडकर, ओमजी वत्से, विवेक देशमुख संदीप गावंडे , अभिमन्यू नळकांडे, अनिल नावकार, नकुल तोडकर, आशिष गिरी, प्रफुलजी खरात, विजय टीकार,केशव हेडा, मयुर शर्मा, राजेश शर्मा, हिमांशू शर्मा , अमित चौधरी, सुमित खाचणे , आकाश टाले, आनंद देशमुख, श्रीकांत लोणकर , गोपाळ सोनवणे, प्रदीप टाले , संतोष देशमुख, संजय गोटेफोडे, आदी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करून निषेध व्यक्त केला. खदान पोलिसांनी  आंदोलन  कार्यकर्त्यांना अटक केली या घटनेचा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आमदार, गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून लोकशाही मधे  विरोधकांचा आवाज दाबण्याचा कुटील डाव सरकार करीत असेल तरी जनतेच्या समस्या साठी भारतीय जनता पक्ष रस्त्यावर येऊन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व अन्यायाच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही यावेळी दिली, मंडळाचे कार्यालय स्थलांतर करण्याचा निर्णय राज्य शासन आणि सरकारने  न फिरवल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन होईल असा इशारा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात यांनी दिला.  शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे गप्प नेते याविरोधात का बोलत नाही ? अकोल्यावर अन्याय होत असताना दिल्ली ते राष्ट्रीय स्तरावर गप्पा करणारे राज्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी कुठे गेले असा सवाल त्यांनी उपस्थित करून त्यांच्या गप्प बसण्यामध्ये अकोल्यावर अन्याय  करण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचा सहभाग आहे का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात उपस्थित झाला आहे ,असाही यावेळी आरोप प्रदेश कार्यकारणी सदस्य तेजराव थोरात यांनी करून भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता हा सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर राहील अशी ग्वाही दिली.
Previous articleजलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी घेतला प्रकल्पांचा आढावा
Next articleमोताळा व शेगावातही बर्ड फ्लूची एन्ट्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here