बुलडाण्यात आज 112 कोरोना पॉझिटिव्ह

0
333

बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 719 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 607 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 112 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.
प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 89 व रॅपिड टेस्टमधील 23 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 169 तर रॅपिड टेस्टमधील 438 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 607 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती पुढीलप्रमाणे मलकापूर शहर : 7, खामगांव शहर : 15, शेगांव शहर : 18, दे.राजा शहर : 7, दे. राजा तालुका : कुंभरी 1, दे. मही 3, गरगुंडी 1, बुलडाणा शहर : 10, बुलडाणा तालुका : धाड 1, साखळी 1, मोताळा तालुका : मकोडी 1, टाकळी 1, मेहकर तालुका : नायगाव दत्तापुर 1, नांदुरा शहर : 8, लोणार शहर : 3, लोणार तालुका : चिंचोली 2, दहिफळ 1, पांग्रा डोळे 1, गायखेड 2, उदानपुर 3, बाभुळखेड 1, किन्ही 3, बिबी 3, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 2, वाघाळा 1, हिवरखेड पूर्णा 1, चिखली शहर : 2, चिखली तालुका : सावरखेड 1, नांदुरा तालुका: टकरखेड 1, निमगाव 2, दादगाव 1, बेलुरा 1, मलकापूर तालुका: देवधाबा 1, भान गुरा 1, सिंदखेड राजा शहर : 1, मूळ पत्ता डोंगरगाव ता. बाळापूर जि. अकोला 1, कौलखेड अकोला 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 112 रूग्ण आढळले आहे.
आज 106 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1098 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 69 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली आहे.

Previous articleआदिवासी भागातील मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ; मानधन २४ हजारांवरुन ४० हजारांवर
Next articleबच्चूभाऊ! एखादा ‘स्टंट’ लोकांना वाचविण्यासाठीही कराल का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here