अकोला: वैद्यकीय यंत्रणेकडून प्राप्त अहवालानुसार गुुरुवारी अकोल्यात १६५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
त्यात ६४ महिला व १०१ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मोठी उमरी येथील ११ जण, कोलखेड येथील १० जण, गौरक्षण रोड व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्येकी नऊ जण, आदर्श कॉलनी, रणपिसे नगर, जूने शहर येथील आठ जण, डाबकी रोड, लहान उमरी येथील प्रत्येकी सात जण, शास्त्री नगर, तोष्णीवाल लेआऊट व साहूरा हॉस्पीटल जवळ येथील प्रत्येकी सहा जण,तापडीया नगर येथील पाच जण, जठारपेठ व खेडकर नगर येथील चार जण, चिंचोली रुद्रायणी ता. बार्शिटाकळी, खडकी, चोहट्टाबाजार, तारफैल, शिवणी, तेल्हारा, मलकापूर, दुर्गा चौक, तुकाराम चौक, बाळापूर नाका, जिल्हा परिषद कॉलनी, अमृतवाडी ता. मुर्तिजापूर, धाबा व सुधीर कॉलनी येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित कच्ची खोली, खोलेश्वर,न्यु खेतान नगर, देवराबाबा चौक, अकोट फैल, आपातापा, सोनाला, सानवी पेठकर रोड, बाळापूर, वाशिम बायपास, रुहीखेड ता. अकोट, दांळवी, गोयका लेआऊट, घाटे हॉस्पीटल, जवाहर नगर, पत्रकार कॉलनी, भागवत वाडी, वृंदावन नगर, रविनगर, अकोट, बाशीर्टाकळी, बोरगाव मंजू, रामदास पेठ, पिकेव्ही, कोलसा, दहिहांडा, जेतवन नगर व मुझीफ्फर नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
तिघांचा मृत्यू
दरम्यान आज तीन जणांचा मृत्यू झाला. त्यात रणपिसे नगर, अकोला येथील ५१ वर्षीय पुरुष असून तो १६ सप्टेंबर रोजी उपचारार्थ दाखल झाला होता. याशिवाय ५५ वर्षीय महिलेचा समावेश असून ती पातोंडा येथील रहिवाशी आहे. तर तिसरा रुग्ण शिवनी येथील ६५ वर्षीय पुरुष असून तो १३ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता.