वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर: काटेल येथील विवाहितेचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याने तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. 26 जानेवारीला घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी सासरच्यांना अटक करुन न्यायालयात सादर केले असता त्यांची तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.
काटेल येथील रहिवासी कैलास फडके यांच्या मुलीचा विवाह गावातील शत्रुघ्न वामनराव सोबत 3 जून 2014 रोजी झाला होता. लग्नानंतर पती व सासरच्यांनी तिला चांगली वागणूक दिली. दोन अपत्ये जन्माला आली आणि त्यानंतर मुलीला सासुरवास घडू लागला. हुंड्यासाठी छळ होऊ लागला. या त्रासाला कंटाळून एक वेळ ती माहेरी गेली होती. मात्र. समेट घडवून आणल्याने परत नांदायला आली. तरीही सासरच्यांनी त्रास देणे बंद केला नाही. या छळाला कंटाळून प्रियांकाने शेवटी आत्महत्या केली. या प्रकरणी कैलास फडके यांनी तामगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शत्रुघ्न डामरे,वामनराव डामरे, शिवाजी डामरे, केशरबाई डामरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत विखे करीत आहेत.