निकोप लोकशाही राखणे प्रत्येकाचीच जबाबदारी – जितेंद्र पापळकर

0
285

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: लोकशाही निकोप राखण्यासाठी मतदारांनी जागरुक असले पाहिजे. जेणेकरुन मतदानापासून कुणीही वंचित राहणार नाही. यासाठी मतदार, निवडणूक प्रक्रिया राबवणारी यंत्रणा, राजकीय पक्ष व सर्वच घटकांनी जबाबदारी ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
येथील लोकशाही सभागृहात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, जयश्री पाटील तसेच सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, नवमतदार उपस्थित होते. जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले, निवडणूक यंत्रणांनी मतदार यादी अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. आवश्यक नावे समाविष्ट करणे, स्थलांतरीत वा अन्य कारणांमुळे मतदारांची नावे वगळणे, रहिवास बदलल्यास भाग बदलणे याबाबत दक्षता बाळगणे आवश्यक असते. त्यामुळे मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येतो. सीईओ सौरव कटीयार यांनीही विचार मांडले.
सुरुवातीला सर्वांनी मतदान करण्याबाबतची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर नवमतदारांना मतदान ओळखपत्राचे वाटप जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उत्कृष्ट कार्य करणारे मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांचा सत्कार करण्यात आला. सर्जेराव देशमुख यांनी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. प्रास्ताविक उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी,संचालन निलेश गाडगे तर सतीश काळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनात  गजानन महल्ले, वैजनाथ कोरकणे, स्वप्निल ओळंबे, उमेश वैद्य, मधुकर मानकर यांचा सहभाग होता.

Previous articleवाशिमचे साहित्यीक नामदेव कांबळे यांना पद्मश्री पुरस्कार जाहिर
Next articleवाहनातून खुलेआम नेले जातेय गौण खनिज; कायद्याबाबत एसडीओ अभयसिंह मोहिते अनभिज्ञ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here