वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
आपल्या देशातील अनेक लोकांना अजूनही कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा मोठा धोका आहे. सध्या विविध देशांमध्ये घातलेल्या किंवा यापूर्वी घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळेच आतापर्यंत अनेकांना याची लागण झाली नाही आणि मृत्यूंचा आकडा अजून वाढला नाही. लस उपलब्ध करून देण्यासाठी देशातील अनेक तज्ञांनी प्रयत्न केलेत आणि लस उपलब्ध करून दिली. ती मानवी शरीरातल्या रोग प्रतिकारक शक्तीला कोरोना विषाणूशी कसं लढायचं हे शिकवेल. यामुळे मुळातच कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही किंवा संसर्ग झालाच तर त्याचे गंभीर परिणाम होणार नाहीत. लस आणि योग्य उपचार पद्धती या दोन्ही गोष्टी एकत्रित केल्या तरच कोरोना व्हायरसची ही जागतिक साथ आटोक्यात येऊ शकेल.
म्हणून सर्वांनी लस घ्या
प्रतिबंधात्मक उपाययोजना करा आणि स्वतःला कुटुंबाला सुरक्षित ठेवा. – उमेश ताठे, लसीकरण सनियंत्रक, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, अकोला