लग्नाच्या नावावर मुलगी दाखवून फसवणूक करणारी टोळी जेरबंद

0
262

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क 
अकाेला : उपवर युवकांना गाठून लग्नासाठी मुलगी दाखवून त्या माेबदल्यात लाखाेंची रक्कम उकळणाऱ्या एका माेठया टाेळीला जेरबंद करण्यात डाबकी राेड पाेलीसांना यश आले. जळगाव खांदेश आाणि नंदुरबार येथील दाेन उपवर युवकांना तब्बल एक लाख ८० हजार रुपयांनी या टाेळीने गंडिवल्यानंतर दाेन महीलांसह पाच जनांना पाेलीसांनी शनिवारी अटक केली. त्यांना रविवारी न्यायालयासमाेर हजर करण्यात येणार आहे.
वाशिम जिल्हयातील मालेगाव तालुक्यातील पांघरी नवघरे येथील रहीवासी सुदाम तुळशीराम करवते उर्फ याेगेश मुळ नाव गुलाब नारायण ठाकरे हा या टाेळीचा म्हाेरक्या असून त्याचे साथीदार शंकर बाळू साेळंके रा. सातमैल वाशिम राेड अकाेला, संताेष उर्फ गाेंडू सिताराम गुडधे रा. आगीखेड ता. पातूर, हरसींग ओंकार साेळंके रा. चांदुर ता. अकाेला या तीन जनांसह दाेन महीला एक जळगाव खांदेश येथील तर दुसरी अकाेला येथील या पाच आराेपींना डाबकी राेड पाेलीसांनी शनिवारी अटक केली. या टाेळीने लग्णासाठी मुली असल्याचे सांगत जळगाव खांदेश आणि नंदुरबार येथील उपवर युवकास एक लाख ८० हजार रुपयांनी गंडवीले.
यामध्ये जळगाव जिल्हयातील चाळीसगाव तालुक्यातील करमुड या गावातील रहीवासी अतुल ज्ञानेश्वर साेनवने पाटील या उपवर युवकास अकाेल्यातील या पाच जनांच्या टाेळीने सुंदर मुलींचे फाेटाे पाठवीले व लग्णाचे आमीष दिले. या आमीषाला बळी पडत अतुल पाटील यांना एक लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. मात्र पाटील यांनी २० हजारांची रक्कम देउन मुलगी दाखविण्याची मागणी केली. मुलगी दाखविल्यानंतर अतुल पाटील यांनी लग्णाची मागणी घातली असता आराेपींनी टाळाटाळ केली. त्यामुळे पाटील यांना फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी डाबकी राेड पाेलीस ठाण्यात तक्रार दिली.
त्यानंतर असाच प्रकार पुन्हा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडाळी येथील रहिवासी राहुल विजय पाटील (२८) यांच्यासाेबतही घडला. त्यांना पातूर येथील सुदाम तुळशिराम करवते ऊर्फ योगेश याच्याशी झाली. त्यानंतर सुदामसोबत चर्चा झाली असता सुदामने काही मुलींचे फोटो पाठविले व यातून मुलगी पसंत करण्याचे सांगितले. मुलगी पसंत येताच मुलीच्या वडिलांना एक लाख ६० हजार रुपये द्या आणि मुलीसाेबत लग्न करून तिला घेऊन जा, असे सांगितले. त्यानुसार १० डिसेंबर २०२० रोजी राहुल पाटील यांचा पुर्ण परिवार अकाेल्यात आला.
त्यांना मुलगी दाखवून तीच्याशी लग्न करायचे असेल तर पातूर रोडवरील महालक्ष्मी माता मंदिरात येण्यास सांगीतले. त्यानुसार लग्णाचा विधी पुर्ण करून त्यांच्याकडून एक लाख ३० हजार रुपयांची रक्कम घेतली. मुलगी नवऱ्यासाेबत जात असतांनाच प्रभात किड्स शाळेजवळ दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्याशी वाद घालत गावातील मुलींना पैसे देऊन घेऊन जात असल्याची आरडाओरड केली. त्यानंतर नवरी गाडीतून उतरली आणि आलेल्या युवकाच्या दुचाकीवर बसून निघून गेली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनीही डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पाेलिसांनी या दाेन्ही प्रकरणात भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ५०४, ३४, ४६५,४६७,४६८,४७१, अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Previous articleअकोल्यात हेल्थ केअर सेंटरमध्ये देहव्यापार, डॉक्टरसह चौघांना रंगेहाथ पकडले
Next articleतेजस्वी हेल्थ केअरचे खामगाव कनेक्शन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here