दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांची कारवाई
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली देह व्यापार चालवणा-या डॉक्टरसह दोघांना आंतकवाद विरोधी पथकाने २२ जानेवारीच्या मध्यरात्री रंगेहाथ पकडले. ही कारवाई आतंकवाद विरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी केली.
डॉ. प्रदीप देशमुख यांनी नागरिकांचे विविध रोग दूर करण्यासाठी जीएमडी मार्केटसमोर तेजस्वी हेल्थ केअर सेंटर सुरू केले. परंतु रोगांचे बरे होण्याऐवजी ते केअर सेंटरमध्ये काम करणा-या महिलांच्या माध्यमातून देहव्यापार करीत होते.
जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी राबविलेल्या दहशतवादविरोधी सेलचे प्रमुख विलास पाटील यांना याची माहिती मिळाली. या माहितीची पडताळणी केल्यानंतर त्यांनी शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्या नेतृत्वात सापळा रचून आरोग्य सेवा केंद्रावर छापा टाकला. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. या केंद्रातून डॉ. प्रदीप देशमुख याच्यासोबत संतोष सानप, रतन लोखंडे याच्यासह पिडीत महिलेला ताब्यात घेतले. एटीसीच्या तक्रारीवरून सिव्हील लाईल पोलिस ठाण्यात देह व्यापार अधिनियम 1956 अंतर्गत 3, 4, 5 नुसार गुन्हा दाखल केला आहे.