जिजाऊची लेक जयश्रीताई पुंडकर हाकत आहेत, तेल्हारा नगर परिषदेचा सक्षमपणे कारभार!

0
306

तेल्हारा शहरांतील विकासासाठी करीत आहेत सर्वोतोपरी प्रयत्न!

पंकज भारसाकळे
व-हाड दूत न्युज नेटवर्क

तेल्हारा: तेल्हारा नगराध्यक्ष जनतेतुन निवडणूक डिसेंबर २०१६ साली झाली. पूर्ण बहुमताने उच्चशिक्षित मुळातच शिक्षिका असलेल्या सौ जयश्री बाळासाहेब पुंडकर ह्या नगराध्यक्षा पदी विराजमान झाल्या पती किंवा कुटुंबाचा कुठलाही राजकीय वारसा न लाभलेल्या मात्र पतीच्या सामाजिक कार्यात अग्रेसर भूमिका पाहता आपल्या छोट्याशा संस्थेच्या माध्यमातून तेल्हारा शहरात आशीर्वाद टाइपिंग ची सुरवात केली. पुढे शिवनक्लास, संगणक प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा, अश्या माध्यमातून अनेक मुला मुलींना स्वयंम रोजगार उपलब्ध करून दिला व अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करून त्यांना प्रशासकिय सेवेत दाखल होण्यासाठी प्रवृत्त केले पुढे त्यांच्यातील असलेल्या जनसेवा करण्याची धडपड त्यांना स्वस्त बसवत नव्हती त्यामुळे त्यांनी विविध शासकीय कार्यालयात गोर गरीब निराधार यांचे समस्या सोडवण्यासाठी अनेक वेळा अधिकारी यांना वेठीस धरीत कामे करून घेतली तर त्यांनी जनसंघाच्या सदस्य ते एबीविपी च्या साध्या कार्यकर्त्या त्या तेल्हारा तालुका महिला अध्यक्ष भाजप ते महिला जिल्हाध्यक्ष असा हा प्रवास सोपा नाही. 
असा राहिला त्यांचा पक्षीय कार्यकाळ
सन २००४-२००६ – भाजप महिला तेल्हारा तालुका अध्यक्ष दोन टर्म
सन २००९-२०११ – भाजप अकोला महिला जिल्हाध्यक्ष 
सन २०११ – तेल्हारा नगर परिषदेच्याच्या सार्वत्रिक निवडणूक
प्रभाग क्रमांक ३ ( क ) मधुन प्रथम सदस्य (नगरसेविका )म्हणून निवड 
२०१२ – नगर परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती म्हणून निवड
२०१३ – नगर परिषदेच्या शिक्षण सभापती पदी निवड
डिसेंबर २०१६ – नगर परिषदेच्या च्या सार्वत्रिक निवडणूक मध्ये जनतेतून सरळ नगराध्यक्षा पदाचा पहिला बहुमान मिळवुन इतिहासात नाव कोरले. 

महाराष्ट्र विधानसभा २०१९ सार्वत्रिक निवडणुकीच्या  अकोला जिल्यातील भाजप पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना अकोला शिवणी विमानतळावर  रिसिव्ह करण्यासाठी  जिल्यातील पहिल्या महिला म्हणून सौ जयश्री बाळासाहेब पुंडकर यांना मान मिळविला. याचे श्रेय ते भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपली निवड झाली असे मत व्यक्त करतात  यावेळी  त्यांच्यासोबत अकोला महानगर भाजप अध्यक्ष किशोर भाऊ  मागटे, खामगाव उमेदवार आकाश दादा पुंडकर, वसंतराव बाछुका, डॉ किशोर मालोकार, जयवंतराव म्हसने, श्रीकृष्ण मोरखंडे आदींची उपस्थिती होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्याच्या विश्वासातील नगराध्यक्षा म्हणून अगदी सलोख्याचे सम्बध म्हणूनच तर स्वता मुख्यमंत्री त्यांना नावाने ओळखत होते. २०१६ च्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याचे तोंड भरून कौतुक केले.
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्याच्या स्वप्नातील स्वच्छ भारत सुंदर भारत उपक्रमात सहभागी होऊन 
तेल्हारा शहर किल्न आणि ग्रीन स्वच्छता अभियान यशस्वी राबविले यात घरोघरी घन कचरा व्यवस्थापन करून तो डम्पिंग ग्राऊंड ला कंपोस्ट केला व पुढे जाऊन सर्व शाळा,कॉलेज,खाजगी संस्था,सामाजिक संघटना विविध पक्ष सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार,अधिकारी  यांनी सहभाग नोंदनुन अकोला मोरणा स्वच्छता अभियानाच्या यशस्वी अनुषंगाने तेल्हारा शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणारी गौतमा नदी स्वच्छता अभियान राबविले गेले पाहिजे हे त्यांच्या मनात आले आणी त्यांनी त्याची परवानगी घेत स्वछता अभियान राबविण्यात सुरू केली पुढे हळूहळू गौतमा नदी स्वछता अभियान मोठे करून ते यशस्वी पूर्ण केले ज्याची स्तुती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी केली होती. 
तेल्हारा शहराच्या विकासासाठी रात्र दिवस एक करीत आपल्या उच्चशिक्षणाच्या जोरावर त्यांनी आपले पूर्ण प्रेजनटेशन देत मोठा निधी खेचून आणून विकासाची कास धरत शहरात सर्वत्र सुंदर रोड व नाल्याचे जाळे निर्माण केले 
दूरदृष्टी ठेवत शहरातिल कायम पाणी प्रश्न सोडविण्यासाठी नवीन घरगुती पाईपलाईन जोडणी केली व सार्वजनिक पाणी प्रश्न कायम सोडवत सर्वत्र नवीन पाईप लाईनचे जाडे निर्माण केले ज्यातून येणाऱ्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाई निर्माण होणार नाही याची तरतूद करून ठेवली. शहराच्या मुख्य आकर्षण केंद्र असलेले जिजाऊ उद्यान ह्यांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून देत भारत सरकारने मंजूर केलेल्या रणगाळ्या साठी तातडीने मंजुरात केली व सुशोभीकरण साठी पुढाकार घेत शहरातील सर्व भागातील असलेले सामाजिक सभागृह असो अथवा उद्यान त्याचा निःपक्षपाती विकास व निधी उपलब्ध केला आहे काही कामे सुरू असून येत्या काळात अजून कामे होणार आहेत. 
त्यांच्या या नगराध्यक्षा पदाच्या यशस्वी कार्याच्या पाठीमागे खंबीरपणे त्यांना सहकार्य करणारे केंद्रीय मंत्री संजय भाऊ धोत्रे, अकोट विधानसभा आमदार, प्रकाशभाऊ भारसाकळे, माजी पालकमंत्री डॉ रणजित पाटील, भाजप अकोला जिल्हाध्यक्ष रणधीर भाऊ सावरकर, जेष्ठ नेते आमदार गोवर्धनजी शर्मा, आमदार हरीशभाऊ पिंपळे, माजी जिल्हाध्यक्ष तेजरावभाऊ थोरात,जिल्हा सरचिटणीस डॉ बाबुराव शेळके ह्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे कार्यकाळ सुरु आहे. 
Previous articleमालवाहूची टाटा-मॅजिकला धडक, २ ठार, ५ जखमी
Next articleअकोल्यात कोविड लसीकरणास सुरुवात, डॉ. आशिष गिरे ठरले पहिले लाभार्थी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here