व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान जळगाव जामोद तालुक्यात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना जळगाव जामोद तालुक्यातील उसरा येथे १५ जानेवारीरोजी संध्याकाळी घडली. जखमींमध्ये बुलडाणा जिल्हा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ पाटील यांचाही समावेश असून त्यांच्यावर खामगाव येथील सिल्वरसिटी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत.
जळगाव जामोद तालुक्यातील उसरा येथे संध्याकाळी मतदारांना बाहेर काढण्यासाठी काही शिवसैनिक गावात पोहचले. दरम्यान एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मज्जाव केला. दरम्यान त्यांच्यात हाणामारी झाली.
यात ८ ते १० जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती केले आहे. तर शिवसेनेचे पदाधिकारी दत्ताभाऊ पाटील यांना खामगाव येथील सिल्वरसिटी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी भरती केले आहे.
याप्रकरणाची दखल घेत पोलिसांनी रुग्णालयाभोवती बंदोबस्त लावला आहे.