अज्ञात वाहनाच्या धडकेने घुबडाचा मृत्यू

0
258
पिम्परी फाॅरेस्ट फाट्या जवळील घटना
उंबर्डा बाजार: अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेने एका महाकाय आकाराच्या घुबडाचा मृत्यू झाला. ही घटना 8 जानेवारी रोजी सकाळी कारंजा ते दारव्ह्य मार्गांवरील पिम्परी फाॅरेस्ट फाट्यानजीक उघडकीस आली.
घटनेबाबत प्राप्त माहितीनुसार घुबड हा निशाचर पक्षी असल्याने सहसा दिवसादिसुन येत नाही. दाट झाडी , सामसुम विहीरी , वास्तव्य नसलेली घरे आदी ठिकाणी या पक्षाचा अधिवास दिसुन येतो. त्यामुळे रात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतो. किटक , कृमी उंदीर आदी त्याचे प्रमुख खाद्य आहे. शेतात होणा-या कीटकनाशकाच्या फवारणी शेतातील कृमी किटक मृत्यू होतात .हेच मृत कृमी किटक पशू पक्ष्याच्या खाण्यात येत असल्याने दिवसेंदिवस घुबड या पक्षाची संख्या कमी होत असल्याने त्याचे संवर्धन होणे काळाची गरज झाली आहे.
Previous article इसमाची विहिरीत उडी घेवुन आत्महत्या
Next articleधांडेंच्या निवडीने सकारात्मक लेखणीचा सन्मान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here