पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना दिली लस

0
382

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

बुलडाणा :पहिल्या टप्प्यातील लस देण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून शुक्रवारी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील लसीकरण कक्षात कोविड लसीकरणाची रंगीत तालिम घेण्यात आली. शुक्रवारी जिल्ह्यात चार ठिकाणी आयोजन केले होते. पालकमंत्र्यांच्या  हस्ते लसही देण्यात आली.
याप्रसंगी जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे उपस्थित होते.
जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, डोणगांव ता. मेहकर येथे प्र. जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या उपस्थितीत,  प्राथमिक आरोग्य केंद्र सोनाळा येथेही कोविड लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली. लसीकरणासाठी सर्व ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली. वेटींग रूम, लसीकरण कक्ष व निरीक्षक कक्ष या त्रिस्तरीय रचनेतून लसीकरण सत्राच्या रंगीत तालमीला सुरूवात करण्यात आली. नोंदणीकृत लाभार्थ्यांच्या मोबाईल क्रमांकावर लसीकरण तारिख, वेळ व ठिकाणचा मॅसेज पाठवण्यात आला. त्यानंतर वेटींग रूममध्ये मॅसेजची पडताळणी केल्यानंतर लाभार्थ्यांची खात्री करण्यात आली. दुस-या कक्षात प्रत्यक्ष लस देण्यात आली तर तिस-या कक्षात 30 मिनिटांसाठी लाभार्थ्याला निरीक्षणासाठी बसवण्यात आले.  लसीकरण रंगीत तालीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी  प्रयत्न केले.
लसीकरण रंगीत तालिम महत्वाचा टप्पा
प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात करण्यापूर्वी हा महत्वाचा टप्पा मानला जात आहे. या बाबतची जिल्हावासियांना उत्सूकता होती. तसेच रंगीत तालिम देखील व्यवस्थित पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Previous articleजिल्हा परिषद शाळेला लागली आग
Next articleरस्ता खोदून ठेवल्याने अपघात वाढले, दुचाकीचा प्रवास धोक्याचा, जिल्ह्यात प्रवास असुरक्षित!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here