वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत जिल्ह्यात 31 डिसेंबरपर्यंत आदेश लागू करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हे आदेश कायम ठेवण्यात आले असून त्याची मुदत दि. 31 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. यापुर्वी प्रशासनाव्दारे लावण्यात आलेले निर्बंधामध्ये देण्यात आलेली सुलभता व टप्पानिहाय लॉकडाऊन उघडण्याबाबतचे आदेश कायम ठेवण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्पष्ट केले आहे. हे आदेश दि. 31 जानेवारीचे मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण अकोला शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.