जवसापासून ‘लिनन’ कापड निर्मितीचे स्वप्न!

0
281

नितीन उजाडे यांचा मानस; ग्रामीण भागात प्रकल्प उभारुन रोजगार निर्मिती करण्याचा ध्यास

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला.
जवसापासून निर्माण होणा-या बायोमासपासून लिनन कापड तयार करण्याचे स्वप्न अकोला तालुक्यातील गोरेगाव खुर्द येथील प्रगतीशील शेतकरी नितीन हरीश्चंद्र उजाडे यांनी उराशी बाळगले आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केला असून त्यात यश आल्यास ग्रामीण भागात प्रकल्प उभारुन रोजगार निर्मिती करता येईल, असा उजाडे यांना विश्वास आहे. या कार्यात त्यांना जवस पैदासकर सहकार्य करीत आहेत.

गेल्या काही वर्षापासून नितीन उजाडे सेंद्रीय शेतीकडे वळले आहेत. हळद तसेच अन्य सेंद्रीय पिके ते घेत आहेत. सोबतच जवस शेतीही करीत आहेत. डॉ. पंदेकृवि नागपूरच्या जवस पैदासकर डॉ. बिना नायर, जवसवेत्ता डॉ. जीवन कतोरे, मोहरी पैदासकर डॉ. संदीप कांबडी, कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी त्यांच्या सेंद्रीय शेतीची पाहणी केली. तसेच जवस शेतीतून कशाप्रकारे प्रगती करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.

जवसा पासून बायोमास तयार करण्यात यशस्वी झाल्यास महाराष्ट्रामध्ये चांगले काम होईल. या क्षेत्रात सध्यातरी आपणच काम करीत असून अन्यत्र कोठे काम होताना दिसत नाही, असेही उजाडे म्हणाले. तसेच माझेही काम प्राथमिक अवस्थेत आहे. जर कापड बनवण्यात यशस्वी झालो तर  ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे रोजगार निर्मिती होऊ शकते, असा विश्वास नितीन उजाडे यांनी व्यक्त केला. या कामा मध्ये डॉ. नारायण लांबट भिवापूर,डॉ.घोरपडे यांचेही नेहमी सहकार्य असते. तांत्रिक मार्गदर्शनासाठी आपण मागील आठवड्यात गांधी आश्रम वर्धा येथे गेलो होतो. तेथील मिलिंदजी यांनी सुद्धा तांत्रिक सहकार्य करण्याची तयारी दाखवली, असे नितीन उजाडे म्हणाले.

जवस पिकाकडे शेतकरी वळू लागले


जवस पिकाकडे आता शेतकरी वळू लागला आहे. जिल्ह्यात सध्या जवसाचे क्षेत्र फारसे नाही. पण पाहिजे तसे मार्केट नसल्यामुळे शेतकरी हिंमत करत नाहीत. फायबर बनवण्याच्या कामात डॉ. के.पी.वर्मा छत्तीसगढ हे देखील मार्गदर्शन करत असल्याचे नितीन उजाडे यांनी सांगितले.

Previous articleबारा जानेवारी होणार आपआपल्या घरी साजरी
Next articleखरोसा लेणी … !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here