वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरापासून काही अंतरावर असलेल्या एमआयडीसी परिसरात एकाची हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री 9 वाजता उघडकीस आली. या घटनेने एमआयडीसीमध्ये एकच खळबळ उडाली.
अप्पू टी पॉईंट जवळ फायरिंग झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेतली. याठिकाणी एका व्यक्तीची निर्गुण हत्या करण्यात आल्याचे दिसून आले. मृतक व्यक्तीचे नाव गोपाल अग्रवाल असल्याचे सूत्रांनी सांगितले.
घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर , अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी भेट दिली असून रात्री उशिरापर्यंत पोलीस तपास सुरू होता. गोपाल अग्रवाल बोरगाव मंजू येथील एका खदानवर मॅनेजर होते. घटनेमागील कारण स्पष्ट होऊ शकले नाही.