वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: पारस रेल्वे स्थानकाच्या नजीक रेल्वेरुळ ओलांडताना गाडी खाली आल्याने अकोल्याच्या रमाबाई आंबेडकर नगरातील रहिवासी मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना 26 डिसेंबर रोजी घडली. प्राप्त माहितीनुसार आई आणि मुलगा हे दोघे जोगलखेडला नातेवाईकाकडे जात होते. दरम्यान काळाने त्यांच्यावर आघात केला. या बाबत रेल्वे पोलिस तपास करीत आहेत. वृत्त लिहिस्तोवर मृतकांचा शोध घेणे सुरू होते.