मंगेश फरपट
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
नांदुरा: ग्राम पंचायतीची निवडणूक म्हटली की गावात वादविवाद, भावबंदकी,राजकीय वैमनस्य, मारामारीचे प्रकार हे
सर्रासपणे होतांना दिसून येतात. या प्रकारांना आळा घालीत सामंजस्यातून तोडगा काढण्यासाठी होवू घातलेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुका बिनविरोध केल्यास विकास कामांसाठी २५ लक्ष रूपयांचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजेेेश एकडे यांनी दिली.
मलकापूर विधानसभा मतदार संघातील मलकापूर ३३ व नांदुरा तालुक्यातील ४८ अशा ८१ ग्राम पंचायतीच्या सार्वजनिक निवडणुका येत्या १५ जानेवारी रोजी होवू घातल्या आहे. राजकीय व सामाजिक सलोखा बिघडूनये व गावातीलवातावरण चांगले रहावे तसेच कायदा, सुव्यवस्था टिकून रहावी व निवडणुकीवर उमेदवारांकडून होणारा खर्च टाळता यावा तसेच निवडणुकीत कुठलेही वादविवाद, भाऊबंदकी, राजकीय वैमनस्य,हाणामाऱ्या याला आळा बसावा व ग्रा.पं. निवडणुका बिनविरोध होवून गावागावात एकोपा कायम रहावा यासाठी आ.राजेश एकडे यांनी मलकापूर विधानसभा मतदार संघातील होवू घातलेल्या ग्रा.पं. च्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी आवाहन केले.
असून अशा अविरोध ग्रा.पं. ला आमदार निधीसह इतर शासकीय योजनांमधून २५ लक्ष रूपयांचा निधी एका वर्षात देण्याचे जाहीर केले आहे.