बुलडाणा
तालुक्यातील झरी येथे मुलगी पाहायला गेलेल्या भादोला येथील २८ वर्षीय युवकाने नात्यातीलच विवाहितेचा २९ नोव्हेंबर विनयभंग केला. मात्र,घटनेच्या दिवसापासून आरोपी फरार झाला आहे. ग्रामीण पोलिसांनी विविध ठिकाणी शोध घेऊनही अद्याप त्याचा थांगपत्ता लागला नाही. दरम्यान, या आरोपीबाबत पोलिसांनी शोधपत्रिका काढली आहे.भादोला येथील नीलेश समाधान गवई (२८) हा २८ नोव्हेंबर २०२० रोजी तालुक्यातील झरी येथे मुलगी पाहण्याकरिता गेला होता. तो ज्या नातेवाईकाकडे थांबला त्या कुटुंबातील विवाहितेवरच त्याने वाकडी नजर ठेवली. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता त्याने २० वर्षीय विवाहितेचा विनयभंग केला. तसेच हात पिरगाळून तुला व पतीला जिवे मारेन अशी धमकी दिली.या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात २ डिसेंबर रोजीगुन्हा दाखल करण्यात आला. घटनेच्या चोवीस दिवसांपासून तो फरार आहे.पोलिसांनी भादोल्यासह विविध ठिकाणी आरोपीचा शोध घेतला. मात्र, अद्याप तो सापडला नाही. अखेर ग्रामीण पोलिसांनी आरोपीची शोधपत्रिका काढली आहे.आरोपी परिसरात कुठेही आढळून आल्यास संपर्क साधावा, असे आवाहन ठाणेदार सारंग नवलकार व पोहेकॉ सुनील हिवाळे यांनी केले आहे.