वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
नांदुरा: आमसरी येथे रविवारी रात्री गावातील चार वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या झाल्या, मात्र पोलिसांनी एकच तक्रार दाखल करून घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्वस्त धान्य दुकानासह गावातील काही घरांना चोरट्यांनी लक्ष बनवत सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली.