वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
नांदुरा: नेहल देशमुख यांची महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआय विद्यार्थी काँग्रेसच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अमीर शेख यांनी राष्ट्रीय अध्यक्ष नीरज कुंदन यांच्या या सूचनेनुसार नियुक्ती केली आहे.
या नियुक्तीमुळे नांदुरा परिसरातील नेहल देशमुख यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. माझी नियुक्ती ही बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे , मलकापूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा. राजेश भाऊ एकडे, प्रदेश महासचिव आकाश भाऊ कवडे यांच्यामुळे झाल्याची भावना नेहल देशमुख यांनी व्यक्त करून त्यांचे आभार मानले आहे.