चाकूचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार

0
363

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

खामगाव : खामगाव तालुक्यातील अंत्रज येथील एका अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देत चौघांनी तिचे अपहरण केले. त्यातील एकाने प्रथम गावा नजीक शेतात तिच्यावर लैगिक अत्याचार केला.व नंतर तिला सोलापूर येथील एका लाजवर नेऊन तिच्यावर लैगिक अत्याचार करण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, अल्पवयीन मुलीला विशाल मनिराम चव्हाण हा गेल्या सहा महिन्यांपासून त्रास देत होता.27 नोव्हेंबर ला अल्पवयीन मुलगी शौचास जात असताना विशाल चव्हाण याने चाकूचा धाक दाखवत तिला दुचाकीवरून एका शेतात नेले तिथे त्याच्या तीन मित्रांनी मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर मुलीला सोलापूर येथे घेऊन जात तेथील एका लॉजवर रूम मध्ये ठेऊन 15 दिवस तिच्यावर लैगिक अत्याचार केला. तिने तेथून सुटण्याचा प्रयत्न केला परंतु  तिला तेथून निघता आले नाही ,मुलीने संधि मिळताच आपल्या बहिणीला फोन करून आपबीती सांगितली त्यानंतर बहीण तिथे आली व तिने चौघाविरूद्ध पोलिसात तक्रार दिली.

 

Previous articleबाबुल की दुवाँये लेती जा…!
Next articleशहिद जवान प्रदीप मांदळे अमर रहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here