वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
चिखली: ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये होणा-या उचापती बंद करण्यासाठी बिनविरोध करा ग्रामपंचायती आणि मिळवा 21 लाखांच्या विकास कामांसाठी निधी अशी घोषणा आ.
श्वेता महाले यांनी करून चिखली विधानसभा मतदारसंघात असलेले सामाजिक व राजकीय सौदार्हाचे वातावरण अधिक घट्ट करण्याचा निर्णय घेतला आहे .
ग्रामपंचायत निवडणुका म्हणजे राजकिय व सामाजिक वातावरण ढवळून काढणारी लढाईच. यामध्ये राजकीय वैमनस्य जोपासण्याचे काम होते. धु-याच्या भांडणाचीही खपली या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ओरबाडून काढून जखम चिघळवून ठेवण्याचे काम केल्या जाते. कोरोना संकटाने जनता व प्रशासन त्रस्त आहे. अनेकांचा रोजगार गेला आहे. सर्वांचीच आर्थिक स्थिती
खालावली आहे. कोरोनाशी लढण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनावर
अधिकचा ताण येऊ नये आणि निवडणूक खर्चाची बचत व्हावी, गावातील वातावरण चांगले राहावे, कायदा व सुव्यवस्था
टिकून रहावी, उमेदवाराच्या खर्चाची बचत व्हाव्या, असे आ. श्वेता महाले यांचे म्हणणे आहे. 21 लाखाचा निधी बिनविरोध निवडून आलेली ग्रामपंचायत बॉडी सांगेल त्या कामांवर खर्च करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे आवाहन आ. श्वेता महाले पाटील यांनी केले आहे.