युवराज पाटील
8888164834
द लीफ, डी – 801, येवलेवाडी- कात्रज, पुणे.
लेखक, महाराष्ट्र शासनाच्या सेवेत जिल्हा माहिती अधिकारी म्हणून सातारा येथे कार्यरत आहेत)
वऱ्हाड दूत विशेष ; इतिहासाचं पान
ज्याच्याकडे प्रचंड सैन्य आहे, ज्याच्याकडे मुबलक संरक्षण सामुग्री आहे.. ती सेना तगडी कि ज्याच्याकडे मोजके सैन्य, मोजकी संरक्षण सामुग्री मात्र प्रचंड चातुर्य असेल त्या सैन्याने युद्ध जिंकल्याचे अनेक उदाहरण प्राचीन इतिहासापासून अर्वाचीन इतिहासाच्या पानात आपल्याला सापडतील… महाभारतातील “, अश्वत्थामा हतः इति नरो वा कुंजरो” हे युद्धीष्ठिराच्या मुखातून वदवून मनोधैर्य खचविण्याची नीती असू देत वा अलेक्झांडर आणि पोरसचे उदाहरण असो.
आणि छत्रपती शिवारायांचा इतिहास तर प्रचंड चातूर्याचा आणि धाडसी व गणिमी तंत्राचा होता… चातुर्यासाठी लागणारी शत्रू गटाची इत्यांभूत माहिती गरजेची असते… कधी कधी युद्ध न करता विजय दृष्टिपथात येऊ शकतो… मराठ्यांच्या इतिहासात असे अनेक प्रसंग आहेत पण त्यातला पहिला प्रसंग , शिरवळ येथील सुभानमंगल किल्याच्या संदर्भात आहे… हा किल्ला सकाळी विजापूर कराला दिला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे अत्यंत चातुर्याने ताब्यात घेतला… फतेहखान आणि बाळाजी हैबतराव या दोघांना गाफिल ठेवून कावजी मल्हार खासनीस यांच्या सोबत निवडक मावळे पाठवून नीरा नदीतून मागच्या बाजूने पहाटे हल्ला चढवून किल्ला ताब्यात घेतला… एकही मावळा न गमावता स्वराज्याची पहिली लढाई जिंकली… शत्रू पक्षाचे मनोधैर्य खचून फतेहखानाने विजापूरकडे पळ काढला होता… औरंगजेबचा मामा शाहिस्तेखान याच्या बाबतीतही कात्रजच्या खिंडीत शेकडो बैल शिंगाणा टेन्भे लावून सोडले ते सैन्य आहे असे समजून मुघल सैन्य पाठलाग करू लागले आणि छत्रपती साहिसलामत सुरक्षित स्थळी पोहचले.. अफझलखानाच्या बाबतीतही अनेक प्रसंग घडवून आणले… त्याचा प्रिय हत्ती घातपात करून मारण्या पासून ते त्याला घनदाट जंगलातील प्रतापगडाच्या पायथ्याशी चिढून येण्यासाठी अनेक प्रसंग पेरले गेले… हे सगळे करताना सर्वात महत्वाचा हात गुप्तहेर विभागाचा असतो आणि तो गुप्तहेर हा स्वराज्याच्या लढाईटला तिसरा डोळा होता… त्या काळी सर्वाधिक गुप्त खबऱ्या तिन्ही शह्या पेक्षा मराठ्यांकडे होत्या… त्यामुळेच छत्रपतीनी आग्र्या वरून साहिसलामत सुटका करून घेतली… 1659 नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरा पगड जातीतील लोकांचा हेर खाते मजबूत करण्यासाठी वापर केला आणि त्याचे नेतृत्व बहिर्जी नाईक यांच्याकडे दिले… त्यामुळे औरंगजेब सारख्या मातबर साम्राटाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यानंतर छञपती संभाजी महाराजांच्या सैन्यावर आणि सम्राज्यावर पूर्णपणे मात करता आली नाही. मराठ्यांच्या गनिमी काव्यातील सर्वात मोठी ताकत ही गुप्तहेर होती म्हणून इस्त्राईलच्या मोसादने सुद्धा याचा अभ्यास केला… हा सगळा इतिहास आठवण्या मागे भूपाळगड सध्या बानूरगड ता. आटपाडी येथे मागच्या काही दिवसापूर्वी मी गेलो होतो… तिथे बहिर्जी नाईक यांची समाधी आहे ( याला कागदोपत्री कोणताही पुरावा नाही ) पण भूपाळगडाला मात्र मराठ्यांच्या इतिहासात अनन्य साधारण महत्व आहे… “बुसातीन -उस -सलातीन ” या साधन ग्रंथात अनेक नोंदी आहेत… हा किल्ला स्वराज्याचा शेवटचा किल्ला होता, त्यानंतर विजापूर करांची हद्द लागत होती.. त्यामुळे भौगोलिक दृष्टीने हा किल्ला महत्वाचा होता… पण चढाईसाठी अत्यंत सोपा किल्ला असल्यामुळे इथून कोणतीही मोठी मोहिम छत्रपती शिवाजी महाराजांनी आखली नाही पण दक्षिण काबीज करताना लॉजिस्टिकसाठी हा किल्ला अतिशय महत्वाचा ठरला.. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि स्वराज्याचा तिसरा डोळा गुप्तहेर खाते सांभाळणारे बहिर्जी नाईक मला मराठ्यांच्या सम्राज्यातील अतिशय महत्वाचे अंग वाटते.. नगर जिल्ह्यातील शिंगावे गावी जन्मलेल्या बहिर्जी नायकांवर पहिल्यांदा भालजी पेंढारकरांनी चित्रपट काढला… मी आता ऐकतोय माझे स्नेही किरण माने बहिर्जी नाईक यांच्या जीवनावर काढल्या जाणाऱ्या चित्रपटाच स्क्रिप्ट लिहत आहेत अशी सूत्रांकडून माहिती कळते आहे. पण बहिर्जी नाईकांचा अधिकाधिक इतिहास शोधला तर आपल्या देशाच्या सुरक्षा विभागाला गुप्तहेर बाबतीत अनेक इनपुट मिळू शकतात कदाचित त्यांनी तो अभ्यास केलाही असावा… रवि आमले यांचे प्रॉपगंडा पुस्तक वाचल्या पासून जगभरातील गुप्तहेर काय काय करू शकतात हे वाचण्यात आल्या पासून बहिर्जी नाईकांची समाधी आणि भूपालगड पाहायचा होता… तो पाहिला आणि त्यानिमित्ताने गुप्तहेर बाबतीत थोडा अभ्यास करता आला… मित्रहो भूपाळगडावर ( बानूरगड ) आज पाहण्यासारखे काही नाही पण मोठा इतिहास इथे दडला आहे हे मात्र निश्चित…!!
जय भवानी.. जय शिवराय !