नववर्षाच्या प्रारंभी प्रत्येकाला मिळणार कोरोना लस

0
419

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

मुंबई: नव्या वर्षाच्या प्रारंभी राज्यात कोरोना लस देण्याचा प्रारंभ होऊ शकतो, असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिले. काेरोना लस देण्याचे प्राधान्यक्रम निश्चित झाले असून राज्याच्या ३६ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आराेग्यमंत्री टोपे यांनी आज रक्तदान केले. त्यानंतर पत्रकारांशी बाेलताना टोपे म्हणाले की, कोरोना लस पहिल्यांदा आरोग्य सेवकांना, नंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर ५० वर्षांवरील कोमोर्बिड लोकांना दिली जाणार आहे. हे लसीकरण पूर्ण झाल्यावर सर्व ५० वर्षांवरील लोकांना लस देण्यात येणार आहे.

११ कोटींपैकी ३ कोटी लोकांना लस पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे. यादी तयार करून मतदान बूथप्रमाणे लस दिली जाईल. लस दिल्यानंतर ३० मिनिटे तिथे बसवले जाईल. केंद्राकडून आलेली लस नवी मुंबईतील वाशी केंद्रात ठेवली जाणार असून तेथून वितरण केले जाणार आहे. लसीकरणासाठी १६ हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आल्याचेही टोपे यांनी सांगितले. लसीकरणासाठी विविध स्तरांवर समन्वय यंत्रणा करण्यात आली आहे. राज्यस्तरीय सुकाणू समितीनंतर राज्य कृती दल, राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हास्तरावर जिल्हा कृती दल, जिल्हा नियंत्रण कक्ष, तालुकास्तरावर तालुका कृती दल आणि तालुका नियंत्रण कक्ष अशी यंत्रणा आहे.

आतापर्यंत शासकीय आरोग्य संस्थेतील ९९ टक्के तर खासगी आरोग्य संस्थेतील कर्मचाऱ्यांचा ७८ टक्के डेटा झाला आहे. लस टोचण्यासाठी १६ हजार २४५ कर्मचाऱ्यांची को-विन पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. आतापर्यंत को-विन पोर्टलवर ९० हजारांहून अधिक लाभार्थींची नोंदणी झाल्याची माहिती टोपे यांनी दिली. लसीकरण पथकामध्ये पाच सदस्यांचा समावेश असेल.

माेबाइलवर प्रमाणपत्र
महाराष्ट्रातील ३४४ रक्तपेढ्यांमध्ये लसीकरणानंतर त्या व्यक्तीच्या मोबाईलवर संदेश येईल आणि क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्रदेखील पाठविण्यात येईल, असे राजेश टोपे यावेळी म्हणाले.

Previous articleमॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या चौघांना टाटा एस ने चिरडले
Next articleगैरसोयीच्या जंगलात घर नाही अन् घरपणही नाही.. देव्हारीच्या पूर्नवसनाचे देऊळ पाण्यातच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here