ज्ञानगंगा अभयारण्यात नवीन पाहूण्याचे आगमन

0
328

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

बुलडाणा:जिल्ह्यातील सन १९९७ मध्ये निर्माण करण्यात आलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात
दिनांक ३० नोहेंबर २०१९ रोजी सी वन टी वन या पट्टेदार वाघाचे आगमन झाले.
आजही हा वाघ अभयारण्यात आहे. दिनांक ६ डिसेंबर २०२० रोजी सांध्यकाळी ५
वाजता ज्ञानगंगा अभयारण्यातील कर्मचारी वनरक्षक एस.वही झोटे, दिपक
कांडेलकर, वन्यजीव प्रेमी शिक्षक शेषराव कांडेलकर जंगलगस्त करीत असतांना
बुलडाणा वन्यजीव परिक्षेत्रा अंतर्गत पश्चिम देव्हारी बिटमध्ये अचानक
रानगवा दिसून आला आहे. ज्ञानगंगा अभयारण्य परिसरातील पर्यटकांना आता नवीन
पाहूण्याचे दर्शन होणार आहे. ही बाबा बुलडाणा जिल्ह्यातील वन्यजीव
प्रेमिसाठी आनंदाची आहे. हा रानगवा कुठून आला याबाबत अजून सभ्रम आहे.
लवकरच कुठून आला शोध घेण्यात येणार आहे. आपल्या ज्ञानगंगा अभयारण्यात
रानगवा पाहायला मिळेल या कारणाने वन्यजीव सोयरे परिवारात आनंदाचे वातावरण
निर्माण झाले आहे. ज्ञानगंगा अभयारण्य अनेक वन्यजीवांसाठी पोषक आहे
त्यामुळे पुढील काळात अनेक वन्यजीव इतर अभयारण्यातून आपल्या ज्ञानगंगा
अभयारण्यात वास्तव करण्यास येथील यात तिळमात्र शंका नाही.

Previous articleनवीन ३० कापूस खरेदी केंद्र नियोजित
Next articleशाळा बंद मात्र गणवेशाचे पैसे खात्यात, 4662 विद्यार्थ्यांना होणार लाभ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here