व-हाड दूत न्युज नेटवर्क
खामगाव: ब-याच दिवसांपासुन रखडलेल्या पॉलीटेक्नीक प्रवेश प्रक्रीयेला आता सरुवात होत आहे. तंत्रशिक्षण संचालनालय यांचे परिपत्रकानुसार 12 डिसेंबर 2020 पासुन ऑप्शन फॉर्म चा भरणा करण्यास सुरुवात होणार आहे.
ऑगष्ट 2020 पासून पॉलीटेक्नीक प्रथम व थेट व्दितीय वर्ष प्रवेशासाठी नोंदणी सुरु झाली होती. मात्र सुप्रीम कोर्टाच्या (एस ई बी सी) वर्गाकरीता आरक्षणाबाबत निर्णय उशीच लागल्यामुळे पॉलीटेक्नीक प्रवेश प्रक्रीयेची वेळ सतत पुढे ढकलण्यात येत होती. मात्र आता सदर निर्णय आला असून नोंदणी केलेले विद्यार्थी 12 डिसेंबर 2020 पासुन आपला ऑप्शन फॉर्मचा भरणा करु शकतात.
प्रथम व थेट व्दितीय वर्ष पॉलीटेक्नीकसाठी उपलब्ध प्रवर्गनिहाय जागा संचालनालयाच्या संकेतस्थळावर 11 डिसेंबर 2020 रोजी प्रदर्शीत होतील. 12 ते 14 डिसेंबर दरम्यान नोंदणीकृत विद्यार्थ्यांना पहिला ऑप्शन फार्म चा भरणा करावयाचा आहे. पहिल्या फेरीचे तात्पूरते जागा वाटप दि. 16 डिसेंबर ला प्रदर्शीत होईल. पहिल्या फेरीमध्ये वाटप करण्यात आलेल्या जागेची स्वीकृती करणे दि. 17 ते 18 डिसेंबर 2020 पर्यत होईल. वाटप झालेल्या संस्थेमध्ये दि. 17 ते 18 डिसेंबर दरम्यान प्रवेश घ्यावयाचा आहे. दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा दि. 20 डिसेंबर 2020 रोजी प्रदर्शीत होतील. दुसऱ्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म चा भरणा दि. 21 ते 22 डिसेंबर 2020.
दुस-या फेरीसाठी तात्पुरते जागा वाटप 24 डिसेंबर 2020 ला होईल. दुसऱ्या फेरीत वाटप झालेल्या जागेची स्विकृती दि. 25 ते 28 डिसेंबर 2020 दरम्यान प्रवेश घ्यावयाचा आहे. केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेसाठी चालु वर्षी फक्त 2 फेऱ्या ठेवण्यात आल्या आहेत. संस्था स्तरावरील कोटयामध्ये व कॅप नंतर रिक्त राहिलेल्या जागात प्रवेश घेण्यास इच्छूक उमेदवारांनी ई स्क्रुटीनी पध्दत किंवा प्रत्यक्ष स्क्रुटीनी पध्दत व्दारे नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी व अर्ज भरण्याची निश्चीती करणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांनी प्रवेशासाठी संस्थामध्ये स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक आहे. सर्व संस्थासाठी शैक्षणिक उपक्रमांची सुरुवात ही 21 डिसेंबर 2020 पासुन होणार आहे.
सर्व उमेदवारांनी आपला ऑप्शन फॉर्मचा भरणा शासन अधिकृत सुविधा केंद्रावरुनच भरण्याचा सल्ला सुविधा केंद्र 1268 व सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पसचे प्राचार्य प्रा. पि. एन. कोल्हे यांनी दिला आहे. व भविष्यातील अगणीत रोजगार संधी मिळवून देणाऱ्या पॉलीटेक्नीक अभ्यासक्रमांस जास्तीत जास्त संस्थेने विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
विद्यार्थी अधिक माहितीसाठी समुपदेशन अधिका-यांशी मो.क्र. 8830463738 व 9373402607 यावर संपर्क करु शकतात असे सुध्दा त्यांनी सांगितले. तसेच 8 डिसेंबर रोजी सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पसचे प्राचार्य हे Google meet App व्दारे वेबीनार घेऊन सर्वांना प्रक्रियेबाबत सखोल मार्गदर्शन सुध्दा करणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी त्यासाठी सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पस या सुविधा केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.