दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक, एक ठार

0
282

व-हाड दूत न्युज नेटवर्क
शेगावः शेगाव ते पाळोदी रस्त्यावर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याने दुचाकीस्वार एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना ४ डिसेंबर रोजी संध्याकाळी घडली.
याबाबत ग्रामीण पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिवान  टाकळी येथील सुनील गोपाल फुलकर वय ३५ हे त्यांच्या नात्यातील मुलीच्या लग्नासाठी  पाळोदी येथे आले होते. लग्नामध्ये आंदन आणण्यासाठी पहूरकर नावाच्या व्यक्ती सह आपल्या दुचाकी क्रमांक एमएच २८ बीएस ४०५१ ने  शेगावला येत असताना पाठीमागून आलेल्या विना क्रमांकाच्या दुचाकीस्वार मिजाज सत्तार कुरेशी याने दुचाकीला मागून धडक मारली. ही धडक इतकी जोरदार होती की सुनील गोपाल फुलकर हे जागेवरच मृत्युमुखी पडले तर त्यांचे सोबती पहुरकर हे गंभीररीत्या जखमी झाले. दोघांनाही शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी सुनील फुलकर यांना मृत घोषित केले तर गंभीर जखमी असलेल्या पहुरकर यांच्यावर प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले. वृत्त लिहेपर्यंत पोलिस कारवाई सुरू होती.

Previous articleभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता
Next articleमहिलेच्या गळ्यातील सोन्याची पोथ हिसकावून पोबारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here