ग्लाेबल टीचर अवाॅर्डससाठी साेलापूरचे रणजितसिंह डिसले यांची निवड; महाराष्ट्राचा सन्मान वाढवला

0
437

व-हाड दूत न्युज नेटवर्क
मुंबईः
युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येणारा “ग्लोबल टीचर अवॉर्ड” या पुरस्कारासाठी या वर्षी सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांची निवड झाली आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा शिक्षण विकास मंच सातत्याने राज्यातील उपक्रमशील शिक्षकांचा शोध घेऊन त्यांचे कार्य समाजापुढे आणत असतो. संदीप गुंड, बालाजी जाधव आणि रणजितसिंह डिसले ही काही ठळक उदाहरणे. शिक्षण विकास मंचच्या २०१०मध्ये प्रकाशित झालेल्या “उपक्रम: वेचक-वेधक” या पुस्तकात रणजितसिंह डिसले यांचा “स्वयंशिस्तीतून आरोग्याच्या सवयी” आणि याच पुस्तकाच्या २०१५ च्या सुधारित आवृत्तीत त्यांचा “पालक आणि सोशल मीडिया” हा लेख प्रकाशित झाला होता. २०१३ आणि २०१४ मध्ये राज्यातील शाळांमध्ये ई-लर्निंगला प्रोत्साहन मिळावे, यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमार्फत शिक्षकांना देण्यात आलेल्या पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्येसुद्धा त्यांचा समावेश होता. 

Previous articleकिरण सरनाईक आघाडीवरच: शिक्षक मतदारसंघ निवडणूक; दुस-या फेरीचा निकाल
Next articleकिरण सरनाईक यांचा विजय निश्चित! देशपांडे दुस-या तर भाेयर तिस-या क्रमाकांवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here