व-हाड दूत न्युज नेटवर्क
अमरावतीः शिक्षक मतदारसंघ निवडणूक निकालाच्या दुस-या फेरीचा निकाल जाहिर झाला. यामध्ये सुद्धा किरण सरनाईक हेच आघाडीवरच राहिले आहेत. पहिल्या फेरीतही किरण सरनाईक हेच आघाडीवर राहिले हाेते हे विशेष. त्यामुळे किरण सरनाईक यांनाच शिक्षक मतदारांनी कौल दिल्याचे दिसून येते.
पहिल्या पसंतीच्या मतगणनेच्या दुसऱ्या फेरीमध्ये १६ हजार ९१९ मतांपैकी ६०१ मते अवैध व १६ हजार ३१८ मते वैध ठरली. या फेरीतील मते अशी (कंसात दोन्ही फेरी मिळून) : डॉ. नितीन धांडे- १४६१ (२१२७), श्रीकांत देशपांडे – २८२२ (५१२२), अनिल काळे – १४ (२६) , दिलीप निंभोरकर- ४०४ (५५५), अभिजित देशमुख – १४ (२३), अरविंद तट्टे- ६६ (७९), अविनाश बोर्डे- १५७३ (२७४७)), आलम तनवीर- १७(२६), संजय आसोले- ७४ (१०४) , उपेंद्र पाटील- १४ (३५), प्रकाश कालबांडे- ७८२ (१२१९) , सतीश काळे- ११ (८९), निलेश गावंडे- ९३९ (२१२२), महेश डावरे- १४९ (२९०) , दिपंकर तेलगोटे- १०(१६) , डॉ. प्रवीण विधळे- ९ (१६) , राजकुमार बोनकिले- २२४ (५७२), शेखर भोयर- २८११ (४८८९) , डॉ. मुश्ताक अहमद- १७ (२५) , विनोद मेश्राम – ८ (१५) , मो. शकील- १८ (३२), शरद हिंगे- २९ (५४), श्रीकृष्ण ठाकरे- १० (२०) , किरण सरनाईक – २९५७ (६०८८), विकास सावरकर – ३११ (६२५) , सुनील पवार- २१ (५६), संगीता शिंदे- १५५३ (२८५७)
दोन्ही फेऱ्या मिळून ३० हजार ९१८ मतांपैकी २९ हजार ८२९ मते वैध व १ हजार ८९ मते अवैध ठरली. त्यानुसार २९ हजार ८२९ या वैध मतांना भागीले दोन अधिक एक असे सूत्र वापरून कोटा निश्चित करण्यात आला आहे.