व-हाड दूत न्युज नेटवर्क
मुंबई: निवडणूकीवर पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेने बहिष्कार टाकला आहे. संघटनेच्या पदाधिका-यांनी ऐन वेळेवर घेतलेल्या या निर्णयाने मतदानावर परिणाम होणार असल्याचे दिसते.
मागील 15 वर्षापासूनच्या लढ्यानंतर भाजप सरकारने पदवीधर अंशकालीन कर्मचा-याच्या बाजूने निर्णय घेत परिपत्रक काढले. मात्र राज्यात एकाही ठिकाणी पदवीधर अंशकालीन कर्मचा-याची अद्याप नियुक्ती करण्यात आली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत वित्त विभागाने 30 सप्टेंबर 2020 ला परिपत्रक काढले. सोबतच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली. हेही सरकार काहीही करायला तयार नाही. कोणताही प्रश्न मार्गी लागत नसल्याने संघटनेने राज्यात होणा-या पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.