मलकापूर: तालुक्यातील उमाळी येथील ज्ञानदेव त्र्यंबक पाखरे (वय 45) यांचा ट्रकच्या अपघातात मृत्यू झाला. ते बुलडाण्याहून घरी जात होते.
बुलडाणा शहरातील भगवान महावीर मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव पाखरे हे शनिवारी संध्याकाळी मोटारसायकलने घरी परतत होते. मलकापूर मार्गावरील राजूर घाटात ट्रकखाली येवून त्यांचा अपघात झाला. ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागिच मृत्यू झाला.