अकोला शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई, हेल्मेट सक्ती मोहिमे दरम्यान ३५० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

0
293

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यात घडणाऱ्या रस्ते अपघातात हकनाक जीव गमविनाऱ्याचा चढता आलेख पाहता मागील 15 दिवसा पासून पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे आदेशानुसार व अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक सुरेश वाघ ह्यांनी कर्मचाऱ्यांसह अकोला शहरालगतच्या राष्ट्रीय व राज्य मार्गावर हेल्मेट सक्ती करून, हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या विरुद्ध धडक मोहीम राबवून 350 चे वर दंडात्मक कारवाया केल्या.
सदर मोहीम राबविण्या मागे दंडात्मक कारवाई करणे हा उद्देश नसून रस्ते अपघातात डोक्याला इजा होऊन होणारे मृत्यू कमी करणे हा उद्देश असून दुचाकी चालकांना हेल्मेट घालण्याची सवय लागावी हा मुख्य उद्देश असल्याने नागरिकांनी हेल्मेट घालून सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले आहे.

Previous articleजनतेला फसवणाऱ्या ऊर्जा मंत्र्यांवर गुन्हे दाखल करा: कैलास फाटे
Next articleअकाेला जिल्ह्यात उद्यापासून उघडणार शाळा, जिल्हाधिका-यांचे आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here