व-हाड दूत न्युज नेटवर्क
मलकापूर: दारू पिवून घरासमोर धिंगाणा घालणा-या व्यक्तीस नगराध्यक्ष अॅड. हरीष रावळ यांच्यासह समर्थकांनी बेदम मारहाण केल्याची घटना 17 नोव्हेंबररोजी रात्री 9 वाजता घडली होती. याप्रकरणी संबधित व्यक्तीच्या तक्रारीवरून काँग्रेस नेते तथा नगराध्यक्ष अॅड. हरीष रावळ यांच्यासह 25 जणांविरुद्ध दंगलीचे गुन्हे दाखल केले असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
शहरातील शिवाजी नगर येथील किरण साळुंके हा 17 नोव्हेंबररोजी रात्री ९ वाजता दारूच्या नशेत घरासमोर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अॅड. हरीष रावळ यांचे नाव घेवून अश्लिल शिविगाळ सुरु केली. रावळ तेव्हा घरी नव्हते. कुटूंबियांना त्यांना फोनद्वारे माहिती दिली. रावळ आपल्या काही कार्यकर्त्यांसह ताबडतोब घरी पोहचले. साळुंके यास त्यांनी समजावून सांगत घरी जाण्यास सांगितले. मात्र साळुंके याने तरीही धमक्या देवून घरात घुसण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याला हरीश रावळ, प्रमोद उज्जैनकर , निरंजन लेले , संतोष उज्जैनकर यांचेसह पंचविस ते 30 लोकांनी लाठया काठयांनी बेदम मारहाण केली. हा सर्व प्रकार पोलिसांच्या उपस्थितीत झाला. पोलिसांचेही काही न ऐकता बेकायदेशिर मंडळी जमवुन किरण साळुंके यांना मारहाण केली. त्यात साळुंके जखमी झाले. याबाबतच्या तक्रारीवरून शहर पोलिस स्टेशनला अॅड. हरिष रावळ यांच्यासह कलम 323, 324, 143,147, 149,269, 270,188,504, 506 भादंविनुसार तसेच कलम 135 मुपोका अन्वये नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांचेसह इतर पंचविस लोकांवर दंगल करून बेकायदेशिर मंडळी जमवुन मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हरीष रावळांसह सहा जणांना गुरुवारी सकाळी 11 वाजता अटक करण्यात आली. अधिक तपास शहर पोलिस निरिक्षक कैलास नागरे करीत आहे.