बुलढाणा: बुलढाणा शहरातील डीएसडी मॉल ला काही वेळापूर्वी आग लागून एका दुकानातील माल जळाल्याची घटना घडली.
सुभाष कुटे यांच्या शिवकृपा इलेक्ट्रॉनिकला शॉर्ट सर्किट मूळे आग लागली. अग्निशमन विभागाला माहिती मिळताच त्यांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत प्रकरणातील सर्व जळून खाक झाला होता. यामध्ये सुमारे अडतीस लाखाचे नुकसान झाल्याची माहिती आहे.