वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात न दिल्याने त्यांची दिवाळी अंधारात असल्याने त्यांची वेदना शासनापर्यंत पोहचवण्यासाठी शुक्रवारी सकाळी भारतीय जनता पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चून भाकर आंदोलन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कक्षासमोर भाजप जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर, आ. गोवर्धन शर्मा, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, किसान आघाडीचे अध्यक्ष वैकुंठ ढोरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते, शेतकरी यांनी चून भाकर सेवन केली. आरडीसी प्रा. संजय खडसे यांनाही चून भाकरीचा डबा भेट देण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील तहसील कार्यालयासमोर देखील आंदोलन करण्यात आले. अतिवृष्टीधारक शेतक-यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने त्यांच्या वेदनांना पारावार राहिला नाही. नुकसानग्रस्त शेतकयांना कोरडवाहू साठी हेक्टरी 25 हजार रु. तर, बागायतीसाठी हेक्टरी 50 हजार रु. द्यावे, केंद्राच्या एमएसपी कायद्यान्वये 18 प्रकारच्या भरड धान्याची, कापसाची खरेदी सुरू करावी,दिवाळीतही खरेदी सुरू ठेवावी, शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, संत्रा, केळी व इतर फळबागांच्या विम्याचे बदललेले निकष त्वरित रद्द करुन सन 2018-19 चे निकष कायम करावे, किसान क्रेडिट कार्डची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, कृषिपंपाचे वितरण त्वरित करावे, रासायनिक खते, बियाण्यांचा पुरवठा करावा आदी मागण्या करण्यात आल्या.
महापौर अर्चना मसने, उपमहापौर राजेंद्र गिरी, किशोर मांगटे पाटील, हरिभाऊ काळे, संजय बडोणे, सागर शेगोकार,अक्षय गंगाखेडकर, संजय गोडा, सतीश येवले, श्याम घाटे, तुषार भिरड, अमोल गीते, संतोष पांडे, संजय गोटफोडे, सतीश शुक्ला, निखिल बुंदेले, तुषार कांतेकर, महेंद्र राजपूत, नितीन राऊत, धनंजय धबाले, कृष्णा पांडे, जसमितसिंग ओबेराय, शितलकुमार जैन, चंदू महाजन, कैलास रणपिसे, डॉ. अमोल केळकर, महेश टिकार, पुरुषोत्तम माहोरे, सुरेंद्र चव्हाण, फिरोजखान, अनित चौधरी, साधना येवले, चंदा शर्मा, सुनीता अग्रवाल, सारिका जयस्वाल, संगीता नानोटे, आरती घोगलिया, जयश्री दुबे, अंबादास उमाळे, जयकृष्ण ठोकळ, मुरलीधर बोर्डे, रवींद्र गावंडे, राजेश बेले, देवेंद्र देवर, पवन बुटे, बाबुलाल कांगटे, रंजना विंचनकर, जान्हवी डोंगरे, वर्षा गावंडे, हेमंत शर्मा, दिलीप मिश्रा, निलेश ढेवा, सतीश येवले, उमेश गुजर, चंदू महाजन, प्रशांत अवचार, रमेश कटिहार आंदोलनात सहभागी होते.
जिल्हाभर आंदोलनात 10 हजार कार्यकर्ते, शेतकरी सहभागी
भाजपच्या आंदोलनात जिल्ह्यात 10 हजारावर कार्यकर्ते तसेच शेतकरी सहभागी झाल्याची माहिती देण्यात आली. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा धिक्कार करण्यात आला.
………………….