नगरसेविका धनश्रीताई देव (अभ्यंकर) यांचे निधन

0
378

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: महापालिकेच्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग क्र 3 (जठारपेठ) च्या नगरसेविका ऍड. धनश्रीताई निलेश देव (वय 38) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
मागील दहा दिवसांपासून त्यांच्यावर ओझोन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. धनश्रीताई ह्या सामाजिक कार्यात अग्रेसर होत्या. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या कार्यकाळात मिशन दिलासा अभियान अंतर्गत उमरी भागातील रहिवासी एका गरीब विधवेला त्यांनी मेसचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव मदत केली होती. याशिवाय शेतकरी कुटुंबातील मुलीला सायकल भेट देऊन तिच्या शिक्षणाचा खर्च उचलला होता. एक संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous articleपेरणी यंत्र उलटून मजूर जागीच ठार
Next articleभाजपचे शेतकऱ्यांसाठी चुन भाकर आंदोलन; निवासी जिल्हाधिकाऱ्यांना दिला चुन भाकरीचा डबा भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here