मंगेश फरपट | वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
नांदुरा: शेतकरी बांधवांंच्या हिताचा कोणताही विचार न करता शेतकरी विरोधी कायदे लादणारे केंद्रातील भाजप सरकार हे जनसामान्यांचे, कामगारांचे, शेतकऱ्यांचे नसून फक्त सुट बुटावाल्यांचे आहे. केंद्र सरकारने घाई गडबडीत शेतकरी विरोधी कृषी विधयके मंजुर करून घेत लोकशाहीचा गळा घोटला आहे. हे शेतकऱ्यांना गुलामगीरीत लोटणारे विधेयक असून देशाच्या पंतप्रधानांच्या व्यापारी व कापोरेट मित्रांनाच याचा लाभ होणार आहे. सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.
परंतू शेतकऱ्याला संध्या साधा हमीभाव देखील मिळत नाही. केंद्राने मंजुर केलेली कृषी विषयक शेतकरी विरोधी कायदे असून ती तात्काळ रद्य करावी, यासाठी नांदुरा तालुका व व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दि.०९ नोव्हेंबर २०२० रोजी मलकापुर *विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार संघर्षयोध्दा मा.राजेश एकडे* यांच्या नेतृत्वाखाली नांदुरा तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधवानसह शेतकरी बांधव व अंदाजे 100 ट्रॅक्टरसह तहसिल कार्यालय नांदुरावर ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यावेळी केंद्र सरकारने मंजुर केलेले शेतकरी विरोधी कृषी विषयक काळे कायदे रद्य करावे अशी मागणी आ.राजेश एकडे यांनी केली. या ट्रॅक्टर रॅलीला तालुक्यातील शेतकरी बांधवांसह जेष्ठ काँग्रेस नेते श्री पदमभाउ पाटील, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवान धांडे, श्री.गौरव पाटील अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी श्री.निलेश पाउलझगडे सरचिटनिस जिल्हा काँग्रेस कमिटी, श्री.जनार्दन दांडगे माजी तालुका अध्यक्ष, मोतेशाम रजा सचिव जिल्हा काँग्रेस कमिटी, मुजम्मील खान, सौ.सुनिताताई गोंड अध्यक्षा तालुका महिला काँग्रेस कमिटी, श्री.बंटी पाटील विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस श्री.सचिन पाटील अध्यक्ष तालुका किसान सेल, श्री.मोहन पाटील गावंडे,श्री.प्रशांत देशमुख, श्री. ज्ञानेश्वर डामरे अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस कमिटी,शुभम लांडे उपाध्यक्ष तालुका युवक काँग्रेस कमिटी, श्री.केशत मापारी, श्री.पुरूषोत्तम झाल्टे सदस्य जिल्हा पुनर्वसन समिती, श्री.राजु हाडे पाटील विधानसभा उपाध्यक्ष युवक काँग्रेस, श्री.आकाश वतपाळ उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, श्री.अतुल पाटील उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, श्री.शंकर बोदडे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष,श्री.शिवाभाऊ मानकर उपाध्यक्ष तालुका युवक काँग्रेस कमिटी, नांदुरा नगर परिषदेचे नगर सेवक सर्वश्री. संदिप फाटे, निलेश कोलते, प्रमोद गायकवाड, श्री.किशोर खैरे, श्री.अजय भिडे, श्री.पिंटु कोलते, मुख्तारशेठ, श्री.महेश चांडक, काँग्रेस कार्यकर्ते श्री.प्रदिप वतपाळ, श्री.गजानन चांभारे, श्री.नारायण झाल्टे, श्री.संदीप बोचरे, श्री.राजु पाटील हिवाळे, श्री.उदय सरोदे, एकबाल खान, श्री.विनोद अढाव, श्री.राजेंद्र चांभारे, प्रकाश ठोंबरे, श्री.सुनिल वेरूळकर, श्री.सुशिल वाकोडे, श्री.पंजाबराव धांडे, श्री.सागर पाटील, श्री.पिंटु होनाळे, श्री.संदिप होनाळे, श्री.विठ्ठल जुनारे,श्री.ज्ञानेश्वर मानकर प्रामुख्याने उपस्थित होते.