जलसंधारणाची कामे करण्यासाठी निधी उपलब्ध होणार : आ. राजेशभाऊ एकडे

0
587

मंगेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क

नांदुरा : मलकापूर विधानसभा मतदारसंघातील मलकापूर व नांदुरा तालुक्यांचा कायम अवर्षण प्रणव तालुक्यात समावेश आहे. त्याच प्रमाणे या दोन्ही तालुक्यातील पूर्णा नदीच्या तिरावरील गावे खारपानपट्ट्यातील आहे. या दोन्ही तालुक्यात जलसंधारणाची कामे करणे नितांत आवश्यक  आहे. या अनुषंगाने *मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश एकडे यांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकररावजी गडाख यांची भेट घेऊन मतदार संघातील जलसंधारणाच्या कामाचा अनुशेष बाबतची माहिती दिली. मलकापूर विधानसभा मतदार संघातील विश्वगंगा, नळगंगा व ज्ञानगंगा नदीवर शासनास सादर केलेल्या प्रस्थावास नदी पुनर्जीवन अंतर्गत बंधारे बांधण्या करिता निधी उपलब्ध करून द्यावा तसेच मलकापूर व नांदुरा तालुक्यातील जलसंधारणाच्या नवीन कामाचे सर्वेक्षण करून त्याची अंदाजपत्रक मंजूर करावी अशी मागणी निवेदनाद्वारें केली. जलसंधारणाच्या कामाचा अनुशेष लक्षात घेता मृद व जलसिंचन विभागाचे सचिव यांना सादर बाबतचा प्रस्थाव मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश दिले.

Previous articleमहाराष्ट्राचे कोरोना उपाययोजनेंतर्गत उल्लेखनीय कार्य
Next articleकोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते! बेफिकीरीने वागू नका, मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here