योगा, स्विमिंग पुल, सिनेमा हॉल व इनडोअर खेळ सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

0
259

अकोला : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत महसूल व वन विभागाच्या सूचनेनुसार गुरुवार दि. 5 नोव्हेंबर 2020 पासून स्वीमींग पूल, योगा संस्था, सर्व प्रकारचे इनडोअर खेळ व चित्रपत्र गृह सुरु करण्याबाबतचे आदेश प्रतिबंधात्मक आदेश अटी व शर्तीच्‍या अधिन राहून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केले आहे.

मिशन बिगेन अगेन अंतर्गत गुरुवार दि. 5 नोव्‍हेंबर पासून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्‍यात आल्‍या आहेत.  कोविड-19 चा प्रादुर्भाव व फैलाव होवू नये या करिता सामाजिक अंतर व इतर आवश्‍यक उपाययोजनेचा अवलंब करुन अकोला जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्राबाहेरील (Outside the Containment Zone)  दि. 5 नोव्‍हेंबर पासून पुढील नमूद केलेल्‍या बाबी पुढील आदेशापर्यंत सुरु करण्यास याद्वारे परवानगी देत आहे.
स्‍वीमींग पूल- राज्‍य , राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील  खेळाडूंना सराव करण्‍याकरिता (या करिता क्रिडा व युवक कार्य विभाग यांचे कार्यालयाकडून स्‍वतंत्र मानके निर्गमित करण्‍यात येतील), योगा संस्‍था (या करिता सार्वजनिक आरोग्‍य विभाग यांचे कार्यालयाकडून स्‍वतंत्र मानके निर्गमित करण्‍यात येतील) सर्व प्रकारचे इनडोअर स्‍पोर्टस , जसे बॅडमिन्‍टन, टेनीस, स्‍काश, इनडोअर शुटींग रेन्‍ज ई., सिनेमा हॉल, थियेटर, मल्‍टीप्‍लेक्‍स, ड्रामा थियेटर हे एकूण आसन क्षमतेच्‍या 50% मर्यादेत सुरु करता येईल. (या करिता  सांस्‍कृतीक कार्य विभाग व स्‍थानिक प्राधिकरण यांचे कार्यालयाकडून स्‍वतंत्र मानके निर्गमित करण्‍यात येतील)सदरचे आदेश हे दि. 4 नोव्हेंबर  पासून  संपूर्ण अकोला  शहर व जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील

Previous articleखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर! सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
Next article

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here