मोदी सरकारला हद्दपार करण्याचा संकल्प घ्या: राणा दिलिपकुमार सानंदा ; शेतकरी व कामगार विरोधी काळया कायद्याविरोधात जिल्हा काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

0
365

मंगेश फरपट |
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
खामगाव: सत्याग्रहामध्ये फार मोठी ताकद असते. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सत्याग्रह आंदोलनाच्या माध्यमातूनच  इंग्रजांना देशातून हद्दपार केले. भारत देशाला स्वातंत्र मिळवून दिले. गांधीजींचा तोच आदर्शवाद आत्मसात करुन ‘सत्याग्रह आंदोलना’च्या माध्यमातून केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या शेतकरी व कामगार विरोधी काळया कायद्यांविरोधात सातत्याने जनजागृती करुन जनआंदोलन उभारुन केंद्रातील मोदी सरकारला सत्तेतून हद्दपार करण्याचा सर्वांनी संकल्प घ्यावा असे आवाहन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले.
31 ऑक्टोबररोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व राष्ट्रमाता इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथी काँग्रेस पक्षाने ‘किसान अधिकार बचाव दिवस’ म्हणून पाळण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार शेतकरी व कामगारांच्या हिताला बाधा पोहचविणा-या काळया कायद्यांविरोधात केंद्रातील मोदी सरकारचा निषेध नोंदविण्याकरीता बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने खामगाव येथील स्व.राजीव गांधी उद्यान येथील जयस्तंभासमोर माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सत्याग्रह आंदोलन’ करण्यात आले. त्याप्रसंगी बोलतांना त्यांनी उपरोक्त आवाहन केले.
यावेळी बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष  प्रकाश पाटील, महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.ज्योतीताई ढोकणे, बुलडाणा जि.प.अध्यक्षा सौ. मनिषाताई पवार, जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती सौ.ज्योतीताई पडघण, महिला प्रदेष काँग्रेसच्या कमिटीच्या सरचिटणीस डॉ. तब्बसुम हुसैन, सतिष मेहेंद्रे, सरचिटणीस सुनिल सपकाळ, काँग्रेस नेते प्रकाशबाप्पु देशमुख, काँग्रेस नेते ज्ञानेश्वर पाटील, चिंत्रागण खंडारे, जळगांव जामोद मतदार संघाच्या काँग्रेस नेत्या सौ.स्वातीताई वाकेकर,समाधान सुपेकर, विष्णू पाटील, ज्ञानेश्वर सुरोशे, कलीम खान यांच्यासह बुलडाणा जिल्हयातील काँग्रेस नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

तर होईल अदानी, अंबानी प्रधान देश : राणा दिलिपकुमार सानंदा
पुढे बोलतांना दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, भारत हा कृषीप्रधान देश आहे. परंतू नव्या कृषी कायद्यांमुळे  अदानी, अंबानी हे मालामाल होवून भारत कृषी प्रधान देश न राहता अदानी-अंबानी प्रधान देश होईल असा टोलाही सानंदांनी लगावला. मोदी सरकारने कामगारांचे अधिकार काढून ते उद्योगपतींच्या हातात देण्याचे काम केले आहे. काळया कायद्यांविरोधात काँग्रेसपक्षाने उभारलेल्या लढयात आपल्या न्याय हक्कासाठी सर्व षेतकरी,कामगार बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

आमचा संघर्ष सुरुच राहील- प्रकाश पाटील
याप्रसंगी  जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जुल्मी मोदी सरकारने लागु केलेल्या काळया कायद्यांविरोधात काॅंग्रेसच्या वतीने संपुर्ण देशभरात सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे. जो पर्यंत हे काळे कायदे रदद् होत नाही तो पर्यंत काँग्रेसच्यावतीने हा संघर्ष सुरुच राहणार आहे, असे सांगुन त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचा निषेध केला.

महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले- डॉ. तब्बसुम हुसैन
महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस डाॅ.तब्बसुम हुसैन यांनी आपल्या भाशणातून मोदी सरकारवर हल्ला चढविला. मोदी सरकार हे आंधळ्या बहि-याचे सरकार असून फोडा आणि राज्य करा या तत्वावर मोदी सरकार कामकाज करत आहे. या सरकारच्या काळात शेतकरी, कामगार वर्गावर अन्याय होत असून महिलांवर अत्याचाराचे प्रमाण सुध्दा वाढले आहे असे त्यांनी सांगितले.

कृषी प्रधान देशात शेतक-यांवर अन्याय- सौ. मनिषाताई पवार
बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.मनिषाताई पवार यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, केंद्र सरकार हे हुकुमशाही पध्दतीने वागत असून कृषी प्रधान देशात शेतक-यांवर अन्याय केल्या जात आहे असे सांगून त्यांनी काळे कायदे लागू केल्याबदद्ल मोदी सरकारचा जाहिर निषेध केला.

शेतक-यांचे जीवन उद्धस्त होणार- सौ. ज्योतीताई ढोकणे
याप्रसंगी बुलडाणा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.ज्योतीताई ढोकणे यांनी बोलतांना सांगितले की, देषाच्या सकल उत्पादनात 20 टक्के योगदान देणा-या शेतक-यांचे जीवन नवीन कृषी कायद्यामुळे उद्ध्वस्त होणार आहे. मोदींच्या काळात महिलांवर अन्याय, अत्याचाराचे प्रमाण वाढले असल्याचे सांगत त्यांनी महिला काँग्रेसच्यावतीने काळया कायद्याचा निषेध केला.

भाजपाने देशाची वाईट व्यवस्था करून ठेवली- सुनिल सपकाळ
जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुनिल सपकाळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भाजपाशासित केंद्र सरकारने वाईट अवस्था करुन ठेवली आहे. मोदी सरकार हे खोटारडे सरकार असून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रह आंदोलन उभारले असून मोदी सरकारने हे काळे कायदे तात्काळ मागे घ्यावे अन्यथा यापेक्षाही तीव्र जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.

कृउबास व्यवस्था संपुर्णपणे नष्ट होणार- अनंतराव वानखडे
मेहकर विधानसभा मतदार संघाचे नेते अनंतराव वानखडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, नव्या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्था संपुर्णपणे नष्ट होणार असून भांडवलशाही प्रक्रिया वाढणार आहे. संविधानात्मक पध्दतीने केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने सत्याग्रह आंदोलन आयोजित केले असल्याचे त्यांनी सांगितले.

सत्याग्रह आंदोलनाला प्रतिसाद…
माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली खामगांव येथील स्व.राजीव गांधी उद्यान जयस्तंभ समोर झालेल्या या ‘सत्याग्रह आंदोलनाला’ प्रचंड प्रतिसाद मिळाला. सर्वप्रथम लोहपुरुश सरदार वल्लभभाई पटेल,राश्टमाता इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुश्पहार अर्पण करुन अभिवादन करुन सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. कोरोनाच्या पाष्र्वभुमीवर षासनाने ठरवुन दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करुन षांततेच्या मार्गाने सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
आंदोलना दरम्यान काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गांधी टोपी घालुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. लावण्यात आलेल्या तिरंगी झेंडयामुळे परिसर तिरंगामय झाला होता.
यावेळी रदद् करा-रदद् करा-शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रदद् करा, मोदी हटाओ-शेतकरी बचाओ, मोदी हटाओ-देश बचाओ, भाजपा भगाओ-लोकतंत्र बचाओ, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा गगनभेदी घोषणांनी जयस्तंभ समोरील परिसर दणाणून गेला. याप्रसंगी शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रदद् करण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी अभियान सुध्दा राबविण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक पंजाबराव देषमुख यांनी तर आभार प्रदर्षन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सदानंद धनोकार यांनी केले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला खामगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डाॅ.सदानंद धनोकार, शेगांव तालुका काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले, महिला काॅंग्रेस कमिटीच्या शहर अध्यक्षा सौ. सुरजितकौर सलुजा, तालुकाध्यक्षा सौ.भारतीताई पाटील, माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, माजी जि.प.अध्यक्षा सौ.वर्शाताई वनारे, पं.स.सदस्य सौ.ज्योतीताई सातव, नगरसेविका सौ.संगिता पाटील,पं.स.सदस्य विठठ्ल सोनटक्के, पं.स.सदस्य इनायत उल्ला खॉ, पं.स. सदस्य मनिष देशमुख, नगरसेवक किषोरआप्पा भोसले, नगरसेवक भुशण शिंदे, माजी जि.प.सभापती सुरेष वनारे, माजी जि.प.सदस्य सुरेषसिंह तोमर, माजी जि.प.सदस्य श्रीकृष्ण धोटे, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव तुषार चंदेल, एनएसयुआयचे षहर अध्यक्ष रोहित राजपुत, सोशल मिडीया अध्यक्ष आकाश जैस्वाल,एजाज देषमुख, स्वप्नील ठाकरे, मनोज वानखडे, माजी नगरसेवक परवेजखान पठान, बाजार समितीचे माजी सभापती राजाराम काळणे, दयाराम वानखडे, माजी संचालक प्रमोद चिंचोळकार, अंकुष टिकार, गोविंदा वाघ, अमित भाकरे, शुभम मिश्रा, राजेष जोषी सर, माजी पं.स.उपसभापती गोपाल सातव, ब्रम्हानंद पारस्कर, शिवाजी पांढरे, शिवाजीराव चव्हाण, राजेष जोषी, अन्सारभाई, केषव कापले, दिपक यादव, प्रितम माळवंदे, उत्तम माने, शेख रषिद,,षेख जुल्कर षेख चाॅंद,निवृत्ती धामनकर,सुभाश पेसोडे, फुलसिंग चव्हाण, शाम गायगोळ, रहिम खॅा, दुल्हे खॉ, जसवंतसिंग शिख, वसंता पाटील, अनंता वावगे यांच्यासह बुलडाणा जिल्हयातील खामगांव, शेगांव, जळगांव जामोद, मलकापूर, नांदुरा, मेहकर, चिखली या तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी, कामगार व काँग्रेसच्या विविध संघटना, सेलचे पदाधिकारी, नेते व काँग्रेस कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous articleएसटी कामगारांचे थकित वेतन दिवाळीपुर्वी द्या ! मनसे राज्य परिवहन कामगार सेनेचा आंदोलनाचा इशारा
Next articleशेतकऱ्यांच्या संशोधनास शास्त्रीय जोड दिल्यास कृषी विकास जलद गतीने होईल – कृषिमंत्री ना. दादाजी भुसे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here