वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
शेगाव. भरधाव स्कॉर्पिआेच्या धडकेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बापलेकासह एकाचा मृत्यू झाल्याची घटना 28 ऑक्टोबररोजी रात्री 10.15 वाजता शेगाव-खामगाव रोडवरील माऊली कॉलेजजवळ घडली.
माऊली काॅलेजजवळ एम.एच.28-एएन 7265 ही दुचाकी उभी करून स्वप्नील उर्फ लखन मरिभान बावणे वय 30, त्याचे वडील मरिभान हिरामन बावणे वय 50 आणि शेख रज्जाक शेख रहेमान वय 40 सर्व रा. सरकारी फैल शेगाव हे तिघे रस्त्याच्या कडेला उभे होते. तेवढ्यात शेगावहून खामगावकडे जाणा-या एम.एच.15-बीएन 3349 या स्कॉर्पिआेने धडक दिली. यामध्ये स्पप्नील बावणे व मरिभान बावणे हे दोघे बापलेक जागिच ठार झाले. तर शेख रज्जाक शेख रहेमान गंभीर जखमी झाला. त्याला अकोला येथे उपचारासाठी घेवून जात असताना त्याचा मृत्यू झाला. शेगाव पोलिसांनी याप्रकरणी तक्रारीवरून स्कॉर्पिआे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार संतोष टाले यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.