श्री विजयादशमी उत्सव; मोहनजी भागवत यांनी साधला संवाद

0
396

वऱ्हाड दूत न्युज नेटवर्क 
नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर महानगरच्या वतीने आज सकाळी श्री विजयादशमी उत्सव साजरा झाला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी संवाद साधला. Live .. https://www.facebook.com/TarunBharatNgp/videos/1015005168927898/

सविस्तर उद्बोधन…
।।ॐ।।
आजच्या विजयादशमी उत्सवाच्या संदर्भात आपण पाहत आहोत की हा सण संख्येच्या दृष्टीने अल्प प्रमाणात साजरा केला जात आहे. आपल्या सर्वांनाही त्याचे कारण माहित आहे. कोरोना विषाणूच्या संकटामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आहेत.
मार्च महिन्यापासून कोरोना साथीच्या आजाराने होणाऱ्या परिणामांच्या चर्चांनी जगातील सर्व घटनांना झाकून टाकले आहे.मागील विजयादशमीपासून ते आजपावेतो चांगल्या घटना काही कमी झाल्या नाहीयतं. संसदीय प्रक्रियेला अनुसरून ३८० कलम देखील कुचकामी करण्याचा निर्णय मागील विजयादशमी पूर्वीच झाला होता. दिपावलीनंतर नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने श्री रामजन्मभूमीच्या प्रकरणात निर्विवाद निर्णय देऊन इतिहास रचला. भारतीय जनतेने हा निर्णय संयमाने व विवेकाने स्वीकारला. मंदिराच्या उभारणीचे भूमिपूजन ५ ऑगस्ट रोजी पूर्ण झाले, त्यावेळेस कार्यक्रम स्थळी आणि संपूर्ण देशात सात्विक, आनंददायी तितकेच संयमित, पवित्र आणि सौहार्दपूर्ण वातावरण होते, हे लक्षात येते. देशाच्या संसदेत नागरिकत्व अधिनियम दुरुस्ती कायदा संपूर्ण प्रक्रिया राबवून मंजूर करण्यात आला. शेजारच्या काही देशांमधील जातीय कारणांमुळे छळ झालेल्या आणि त्यामुळे विस्थापित होवून भारतात येणाऱ्या बांधवांना माणुसकीच्या हितासाठी तत्काळ नागरिकत्व देण्याची तरतूद त्यात होती. त्या देशांमध्ये जातीय छळाचा इतिहास आहे. या नागरिकत्व अधिनियम दुरुस्ती कायद्यात कोणत्याही विशिष्ट पंथाचा विरोध नाही.परदेशातून इतर सर्व नागरिकांना नागरिकत्व देण्याच्या कायदेशीर तरतुदी त्या आधीच अस्तित्वात होत्या. त्या तशाच कायम आहेत. परंतु ज्यांना या कायद्याचा विरोध करायचा आहे त्यांनी आपल्या देशातील मुस्लिम बांधवांच्या मनात असे भरले की त्यांना तुमची संख्या भारतात मर्यादित करण्यासाठी या तरतुदी केल्या गेल्या आहेत. याला घेवून जे काही विरोध प्रदर्शन झाले, याचा फायदा उठवत त्या प्रदर्शनांमध्ये काही उपद्रवी आणि हिंसक घटकांनी प्रवेश केला. देशाचे वातावरण तणावपूर्ण बनले आणि जातीय सलोखा मनातून नष्ट होवू लागला. या परिस्थितीवर मात करण्याचा विचार पूर्ण होईपर्यंत कोरोनाचे संकट येवून ठेपले आणि या सर्व बाबी माध्यमांच्या आणि लोकांच्या चर्चेतून नाहीशा झाल्यात. ते कुरापतीखोर उपद्रवी त्या गोष्टी उकरून त्याद्वारे द्वेष आणि हिंसा पसरविण्याचे षडयंत्र करीत आहेत. परंतु जन सामन्यांच्या लक्षात येईल अथवा त्या घटकांना खतपाणी घालणाऱ्या काहींना प्रसिद्धी मिळेल असे कोरोनाच्या आपधापीमध्ये काही झाले नाही.
संपूर्ण जगात अशी परिस्थिती आहे. परंतु जगातील इतर देशांच्या तुलनेत आपला भारत या परिस्थितीत अधिक सक्षमपणे उभा आहे. भारतामध्ये या महामारीच्या विध्वंसकतेचे परिणाम इतर देशांपेक्षा कमी दिसतात. त्याची काही कारणे आहेत. शासन आणि प्रशासनाने तातडीने सर्व देशवासीयांना या संकटाविषयी सावधान केले. सावधगिरी बाळगण्यासाठी उपाय सुचविले व उपाययोजना अत्यंत तातडीने राबवण्याचीही व्यवस्था केली. माध्यमांनी देखील या महामारीसंबंधीच्या बातम्यांना आपल्या प्रसारणाचा एकमेव विषय बनविला. त्यामुळे जरी सर्वसामान्यांमध्ये अतिरिक्त भीतीचे वातावरण निर्माण झाले तरी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून खबरदारी घेण्याची अतिरिक्त सावधगिरी समाजाने सुद्धा बाळगली, हा एक फायदाच झाला. प्रशासनाचे कर्मचारी, विविध उपचार यंत्रणेचे डॉक्टर आणि सुरक्षा, स्वच्छता आणि इतर कार्यासाठी कार्यरत सर्व कर्मचारी यांनी कर्तव्याची जाणीव ठेवली आणि ते आजारी लोकांच्या सेवेत तत्पर राहिलेत. कोरोना विषाणूमुळे स्वत: बाधित होण्याचा धोका पत्करून, दिवसरात्र आपल्या कुटुंबियांपासून दूर राहून त्यांनी युद्धपातळीवर सेवा प्रदान केली. नागरिकांनी देखील आपल्या समाज बांधवांच्या सेवेसाठी स्वयंस्फूर्तीने आवश्यक असलेल्या वेळेची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केला. समाजात कुठेतरी या कठीण परिस्थितीतसुद्धा आपल्या स्वार्थपूर्तीसाठी लोकांच्या अडचणीचा फायदा घेण्याची प्रवृत्ती आढळली. परंतु यात देखील मोठे चित्र दिसले ते म्हणजे शासन, प्रशासन आणि समाज यांच्यातील परस्परसहकार्य, सहभावना आणि परस्पर विश्वास. समाजातील मातृशक्ती देखील स्व-प्रेरणेने सक्रिय झाली. जे लोक साथीच्या आजारामुळे त्रस्त होऊन विस्थापित झाले होते, ज्यांना घरी पगार व नोकरी बंद पडल्यामुळे आपत्ती व उपासमारीला सामोरे जावे लागले, त्यांनीही या संकटाचा सामना करत असतांना आपला धैर्यशीलता आणि सहनशीलता ढळू दिली नाही. त्यांचे दु:ख आणि कष्ट बाजूला सारून ते इतरांच्या सेवेत तत्पर राहिलेत.असे अनेक प्रसंग अनुभवयाला मिळालेत. विस्थापितांना घरी पोहचवणे, प्रवासाच्या मार्गावर त्यांच्या भोजन व विश्रांतीची व्यवस्था करणे आणि पीडित कष्टीत लोकांच्या घरी जेवण वगैरे पोहचवणे अशा आवश्यक कार्यामध्ये संपूर्ण समाजाने मोठे प्रयत्न केले. एकता आणि संवेदनशीलता याची ओळख करून देत, मोठ्या संकटापेक्षा मोठ्या मदतीचा उद्यम उभा करण्यात आला. व्यक्तीच्या जीवनात स्वच्छता, आरोग्य आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या काही पारंपारिक सवयी आणि आयुर्वेदासारखे शास्त्र यावेळेस जास्त उपयोगी सिद्ध झाले.
या संकटात आम्हाला आपल्या समाजातील एकरसपणा, स्वाभाविक करुणा आणि नम्रता, संकटसमयी परस्पर सहकार्य भावनेचा संस्कार हे सर्वकाही ज्याला इंग्रजीत ‘सामाजिक भांडवल’ म्हणतात, त्या आपल्या सांस्कृतिक संचित मूल्यांचा प्रत्यय या संकट काळात देखील आला. स्वातंत्र्यानंतर धैर्य, आत्मविश्वास आणि सहभावनेची प्रचीती अनेकांनी प्रथमच अनुभवली. समाजाच्या घटकांमधील सर्व सेवारत नामचीन, निनावी, जीवित वा शहीद बंधू-भगिनींना, चिकित्सक, नोकरदार, समाजातील सर्व सेवेकरी घटकांना शत-शत नमन आहे. ते सर्व धन्य आहेत. सर्व बलिदानींच्या पवित्र स्मृतीत मनःपूर्वक श्रद्धांजली अर्पित आहे.
या परिस्थितीवर मात करण्यासाठी आता इतर प्रकारच्या सेवांची आवश्यकता आहे. शिक्षण संस्था पुन्हा सुरू करणे, शिक्षकांना वेतन देणे, पालकांना शाळा-महाविद्यालयीन फी भरून पुन्हा अभ्यासासाठी पाठविणे या वेळी समस्येचे रूप घेऊ शकते. कोरोनामुळे फी न मिळालेल्या शाळांमध्ये पगारासाठी पैसे नाहीत. काम बंद पडल्यामुळे मुलांच्या शाळांची फी भरण्यासाठी पैसे नसलेले पालक संकटात आहेत. म्हणून शाळा सुरू कराव्या लागतील, शिक्षकांचे पगार आणि मुलांच्या शिक्षणासाठी काही सेवा सहकार्य करावे लागेल. विस्थापनामुळे रोजगार गेले आहेत, नवीन क्षेत्रात रोजगार मिळू शकेल, नवीन रोजगार मिळू शकेल, पण त्याचे प्रशिक्षण आवश्यक आहे, ही समस्या स्थलांतरितांची आहे. जे परत आले आहेत अशा विस्तापितांना रोजगार मिळेल असे नाही. विस्थापित म्हणून दूर गेलेल्या बंधूंच्या ठिकाणी तेच काम करणारे इतर बांधव सर्व ठिकाणी अजून मिळालेले नाहीत. म्हणून, रोजगाराचे प्रशिक्षण आणि रोजगार निर्मिती हे कार्य करावे लागेल. या परिस्थितीमुळे घरांमध्ये आणि समाजात तणाव वाढण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत गुन्हेगारी, औदासिन्य, आत्महत्या इत्यादी अपप्रवृत्ती वाढू नयेत म्हणून समुपदेशनाची जास्त आवश्यकता आहे.

या संकटाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी मार्चपासूनच संघाचे स्वयंसेवक कार्यरत आहेत. सेवेच्या या नवीन टप्प्यातही ते पूर्ण ताकदीने सक्रिय राहतील. समाजातील इतर बंधू-बांधव देखील दीर्घकाळ या सेवांसाठी कार्यरत राहण्याची त्यांची आवश्यकता समजतील, असा विश्वास आहे की. जगात कोरोना विषाणूबद्दल पुरेशी माहिती नाही. हा एक बहुरूपी विषाणू आहे. खूप लवकर पसरतो. परंतु आपल्याला विदित आहे की तो नुकसान करण्याच्या तीव्रतेत कमकुवत आहे. म्हणूनच, बऱ्याच काळापर्यंत त्याच्यासोबत राहून त्यापासून स्वत;ला वाचवणे, तसेच आपल्या बंधू-बाधवांना या रोगापासून आणि त्याच्या आर्थिक आणि सामाजिक परिणामांपासून वाचविण्याचे कार्य करावे लागेल. मनात भीती बाळगण्याची गरज नाही, सतर्क कृती आवश्यक आहे. आता, जेव्हा सर्व सामाजिक व्यवहार सुरू होतील तेव्हा नियम आणि शिस्त याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असेल.
या साथीच्या विरूद्ध संघर्षात समाजाचे जे नवे रूप उदयास आले आहे त्याचे इतरही पैलू आहेत. संपूर्ण जगात आता अंतर्मुख होऊन विचार करण्याचा नवीन क्रम सुरू झाला आहे. एक शब्द पुन्हा पुन्हा ऐकु येतोय, “न्यू नॉर्मल.” कोरोना साथीच्या आजारामुळे आयुष्य जस स्तब्ध झालाय. अनेक नित्यकर्म थांबले. जेव्हा आपण त्यांच्याकडे पाहतो तेव्हा लक्षात येते की मानवी जीवनात प्रवेश केलेल्या कृत्रिम गोष्टी थांबल्या आहेत आणि त्या जीवनातील सार्वकालिक आणि वास्तविक गरजा होत्या त्या सुरु राहिल्यात. कदाचित कमी प्रमाणात का होईना पण त्या संचालित राहिल्यात. अनावश्यक आणि कृत्रिमतेशी निगडीत बाबी बंद झाल्यामुळे आपण एका आठवड्यात हवेत ताजेपणा अनुभवला. धबधबे, नाले, नद्यांचे पाणी स्वच्छ होऊन वाहताना दिसले. खिडकीच्या बाहेर बागांमध्ये पक्ष्यांची किलबिलाट पुन्हा ऐकू येऊ लागली. जास्त पैशाच्या शर्यतीत, अधिकाधिक उपभोगाच्या वृत्तीमुळे आपण ज्या गोष्टींना दूर लोटले होते, कोरोना परिस्थितीमध्ये त्याच बाबी कामाच्या असल्याने आपण त्या पुन्हा स्वीकारल्या आणि नव्याने आनंदाचा अनुभव घेतला. त्या गोष्टींचे महत्त्व आमच्या लक्षात आले. कोरोनाच्या परिस्थितीने सतत आणि शाश्वत, चिरंतन आणि तात्कालिक या प्रकारचा विवेक साधने सर्व जगातील मानवांना शिकविले. संस्कृतीच्या मूल्यांचे महत्त्व पुन्हा सर्वांच्या नजरेत आले आहे आणि बरेच लोक आपल्या परंपरेत देश-काळाशी सुसंगत आचरण पुन्हा कसे प्रारंभ होईल याविषयी अनेक परिवार विचार करतांना दिसत आहेत.
जगातील लोकांना आता कौटुंबिक व्यवस्थेचे महत्त्व, पर्यावरणाशी मित्र म्हणून जगण्याचे महत्त्व समजले आहे. हे विचार कोरोनाच्या मारे समोर तात्कालिक आहेत. अथवा चिरंतन स्तरावर जगातील मानवतेने आपली दिशा बदलेली आहे. उत्तर देताना तात्कालिक विचार असो की चिरंतन जगामध्ये मानवतेने आपल्या दिशेत थोडे परिवर्तन केले आहे. हे तर काळच सांगेल. परंतु या तात्कालिक परिस्थितीमुळे, जगाच्या मानवतेचे लक्ष शाश्वत मूल्यांकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले आहे.
आजपर्यंत, संपूर्ण जगाला बाजारपेठेच्या आधारावर एकत्र करण्याची कल्पना प्रभावी आणि सर्वांच्या चर्चेत होती. त्याठिकाणी आपापल्या राष्ट्राला त्याच्या वैशिष्ट्यांसह निरोगी ठेवण्यासह आंतरराष्ट्रीय जीवनात सकारात्मक सहकार्याचा विचार प्रभावी ठरत आहे. प्रत्येकजण पुन्हा स्वदेशीचे महत्त्व सांगू लागला आहे. या शब्दांचा आपल्या भारतीय दृष्टिकोनातून काय अर्थ आहे याचा विचार करून आपल्याला या शाश्वत मूल्यांधारित परंपरेकडे जाण्याची जास्त गरज आहे.
असे म्हटले जाऊ शकते की या महामारीच्या संदर्भात चीनची भूमिका संशयास्पद राहिली आहे. त्याने आपल्या आर्थिक सामरिक बळामुळे मदांध होऊन ज्या प्रकारे भारताच्या सीमांवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला, ते संपूर्ण जगासमोर स्पष्ट आहे. भारताचे शासन, प्रशासन, सैन्य आणि सर्व नागरिक या हल्ल्यासमोर कणखरपणे उभे राहिलेत आणि आपल्या स्वाभिमान, जिद्द आणि जाज्वल्य पराक्रमाची ओळख करून दिली, यामुळे चीनला अनपेक्षित धक्का बसला. अशा परिस्थितीत आपण जागृत राहून ठामपणे उभे राहिले पाहिजे. यापूर्वीही चीनची विस्तारवादी मानसिकता वेळोवेळी जगासमोर आली आहे. आर्थिक क्षेत्रात, सामरिक क्षेत्रात, आपली अंतर्गत सुरक्षा आणि सीमा सुरक्षा यंत्रणेत, शेजारी देशांसह आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये चीनपेक्षा अधिक बळकट स्थान मिळवणे हाच चीनच्या आसुरी महत्वाकांक्षेवर नियंत्रण ठेवण्याचा एकमेव उपाय आहे. त्या दिशेने आपच्या राज्यकर्त्यांचे धोरणात्मक पाऊले पडतांना दिसत आहे. प्रगती करत आहेत. श्रीलंका, बांगलादेश, ब्रह्मदेश, नेपाळ सारखे आपले शेजारी देश, जे आपले मित्र तर आहेतच सोबतच मोठ्या प्रमाणात आपल्या समान प्रकृतीचे आहेत, त्यांच्या सोबत आपले संबंध अधिक मैत्रीपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने वेग वाढवला पाहिजे. या कामात अडथळे आणणारे मनभेद, मतभेद आणि वाद-विवादाचे प्रश्न त्वरित सोडविण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील.
आम्हाला प्रत्येकाकडून मैत्री हवी आहे. हा आपला स्थायी स्वभाव आहे. परंतु आमच्या सदभावनेला आमची दुर्बलता समजून, कुणीही आपल्या शक्तीच्या जोरावर भारताला पाहिजे तसे नाचवेल, वाकवेल हे कदापि होणार नाही. हे तर आतापर्यंत असले दुस्साहस करणाऱ्यांना समजायला हवे होते. जे इतके मतभेद आहेत त्यांनाच समजले पाहिजे. आपल्या सैन्याची अतूट देशभक्ती आणि अदम्य पराक्रम, आपल्या राज्यकर्त्यांचा स्वाभिमानी बाणा तसेच आपल्या भारतीयांनी ज्या दुर्दम्य नीती-धैर्याचा जो पहिल्यांदा परिचय चीनला झाला, त्यामुळे तरी आता त्याच्या ध्यानात ही बाब यायला हवी. त्याच्या वागण्यात बदल झाला पाहिजे. परंतु तसे झाले नाही तर जी परिस्थिती उद्भवेल त्या परिस्थितीत आपण आपली जागरूकता, तयारी आणि चिकाटी गमावणार नाही, असा विश्वास आज देशात सर्वत्र दिसून येतो.
देशाच्या सुरक्षा आणि सार्वभौमत्वावर केवळ बाह्य शक्तीचीच आव्हाने आहेत हे समोर ठेवून अशी दक्षता आणि तत्परता विचारात घेतली जात आहे असे नाही तर गेल्या काही वर्षात देशामध्ये अनेक गोष्टी समांतर चालू होत्या, जर त्यांचे निहीतार्थ आपण समजलेत तर या नाजूक परिस्थितीत समाजाची खबरदारी, समज, समरसता आणि शासन-प्रशासनाच्या तत्परतेचे महत्त्व प्रत्येकाच्या लक्षात येते. सत्तेपासून वंचित राहिलेल्या राजकीय पक्षांची सत्ता पुन्हा मिळवण्याचे प्रयत्न ही लोकशाहीमध्ये एक सामान्य पद्धत आहे. परंतु त्या प्रक्रियेतही, विवेकाचे पालन करणे आवश्यक आहे. ती राजकारणातील आंतर-स्पर्धा आहे, शत्रूंमध्ये होणारे युद्ध नाही. स्पर्धा असावी, परंतु ती निकोप असावी, परंतु त्यामुळे समाजात कटुता, भेदभाव, अंतर वाढवणे आणि परस्परांमध्ये वैर होऊ नये, हे ध्यानात घेतले पाहिजे. तसेच या स्पर्धेचा फायदा घेणारी, भारताला कमकुवत किंवा खंडित ठेवणारी, भारतीय समाज सदैव कलहग्रस्त राहावा यासाठी आपल्या विविधतेला गैर सांगून आधी पासून चालत आलेल्या दुर्भाग्यपूर्ण विषमतेला अजून अधिक बिकट आणि संघर्षमय करणारी आणि आपापसात भांडणे लावणारी तत्वे या विश्वात आहेत आणि त्यांचे हस्तक भारतात देखील आहेत. समाजात कोणत्याही प्रकारे गुन्हेगारी किंवा अत्याचाराची घटना होणार नाही, अत्याचारी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर पूर्ण नियंत्रण असले पाहिजे आणि तरीही अशा घटना घडल्यास दोषी व्यक्तीला त्वरित पकडले गेले पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शासन-प्रशासनाला समाजाचा पाठिंबा घेवून निश्चित केले गेले पाहिजे. शासन प्रशासनाच्या कुण्या निर्णयावर किंवा समाजात घडणाऱ्या कुठल्या घटनेवर प्रतिक्रिया देतेवेळी अथवा त्याचा विरोध करतेवेळी आपली कृती सदैव राष्ट्रीय एकात्मतेला ध्यानात ठेवून, त्याचा सन्मान राखत घडली पाहिजे. समाजातील सर्व पंथ, प्रांत, जाती, भाषा इत्यादी विविधतेचा सन्मान ठेवत संविधान कायद्याच्या मर्यादेत अभिव्यक्त होणे जरुरीचे आहे. दुर्दैवाने, देशात या गोष्टींबद्दल प्रामाणिक निष्ठा न ठेवणारे किंवा या मूल्यांचा विरोध करणारे लोक पण आपल्या स्वत:ला लोकशाही, राज्यघटना, कायदा, धर्मनिरपेक्षता यासारख्या मूल्यांचे सर्वात मोठे रक्षक म्हणवून घेत समाजाला गोंधळात टाकत राहिले आहेत. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत दिलेल्या आपल्या भाषणात, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अशा पद्धतींना “अराजकतेचे व्याकरण” म्हटले आहे. अशा छद्म उपद्रवी लोकांना ओळखून त्यांचे षड्यंत्र मोडून काढणे आणि भ्रमिष्ठ होवून त्या लोकांची साथ न देणे योग्य ठरेल.
संघाबद्दल असा भ्रम निर्माण होवू नये म्हणून संघ काही शब्द का वापरतो किंवा काही प्रचलित शब्दांना कोणत्या अर्थाने मांडतो हे समजणे महत्वाचे ठरेल. हिंदुत्व हा असा एक शब्द आहे ज्याचा अर्थ उपासनेशी जोडल्यामुळे त्याचा अर्थ संकुचित केला गेला आहे. संघाच्या भाषेत, अशा संकुचित अर्थाने तो शब्द वापरला जात नाही. हा शब्द आपल्या देशाच्या अस्मितेचा, आध्यात्म्य आधारित परंपरेचे सनातन सातत्य आणि समस्त मूल्य संपदेसह अभिव्यक्ती देणारा शब्द आहे. म्हणूनच संघाचा असा विश्वास आहे की हा शब्द भारतवर्षाला आपले मानणाऱ्या, त्याच्या संस्कृतीच्या वैश्विक आणि सार्वकालिक मूल्यांना आचरणात आणू इच्छीणारे तसेच यशस्वीपणे असे करून दाखवणारी पूर्वज परंपरेचा गौरव मनात ठेवणाऱ्या सर्व १३० कोटी समाज बाधावांना लागू आहे. या शब्दाच्या विस्मरणाने आपल्याला एकात्मतेच्या सूत्रात बांधणारे बंध तसेच देश आणि समाज यांचे बंध शिथिल झालेत. म्हणूनच ज्यांना हा देश आणि समाज खंडित करायचा आहे,ज्यांना आपल्याला आपसात लढवायचे आहे, ते लोक जो शब्द सर्वांना जोडतो त्यालाच आपल्या निंदा आणि टीकेचे प्रथम लक्ष बनवितात. या शब्दापेक्षा कमी प्रतिष्ठेचे असलेले शब्द जे आपल्या वेगवेगळ्या विशेष अस्मितेची ओळख आहेत, हिंदू या शब्दाच्या अंतर्गत पूर्णपणे सन्मानित आणि स्वीकार्य आहेत.समाजाला खंडित करू पाहणारे लोक या विविधतेला विभाजनाच्या स्वरुपात मांडण्यावर जोर देतात. हिंदू कोणत्याही पंथ किंवा संप्रदायाचे नाव नाही, कुण्या प्रांताने व्युत्पन्न केलेला शब्द नाही, हा कोणत्याही जातीचा वारसा नाही, कुण्या एका भाषेचा पुरस्कार करणारा शब्द नाही. आपल्या या समस्त विशिष्ट ओळखीला कायम सन्मानित आणि स्वीकृत करून भारत भक्तीला आणि मानवतेच्या विशाल प्रांगणात सर्वांना सामावून घेणारा आणि सर्वांना जोडणारा शब्द आहे. या शब्दावर कुणाला आपत्ती असेल. जर हेतू समान असेल तर आपल्याला इतर शब्दांच्या वापराबद्दल आक्षेप नाही. परंतु संघ या देशाच्या ऐक्य आणि सुरक्षेच्या हितासाठी, हा हिंदू शब्द आग्रहपूर्वक स्वीकारून, त्याचे सर्व स्थानिक आणि जागतिक अर्थ कल्पनांमध्ये समाविष्ट करून चालतो. जेव्हा संघ ‘हिंदुस्तान एक हिंदू राष्ट्र आहे’ अशी घोषणा करतो तेव्हा त्यामागे कोणतीही राजकीय किंवा सत्ताकेंद्रित संकल्पना नसते. आपल्या राष्ट्राचे ‘स्व’ त्व हेच हिंदुत्व आहे. संपूर्ण राष्ट्र जीवनाचे सामाजिक, सांस्कृतिक क्रिया अभिव्यक्ती करणाऱ्या मूल्यांचा तसेच वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक आणि सामाजिक जीवनाच्या अभिव्यक्तीचे नाव हिंदू असा या शब्दाचा आशय आहे. त्या शब्दाच्या भावनेच्या परीघामध्ये येण्यासाठी आणि राहण्यासाठी कुणाला आपल्या उपासना, प्रांत, भाषा इत्यादीं काही वैशिष्ट्य सोडण्याची गरज नाही. केवळ आपलेच वर्चस्व स्थापित करण्याची इच्छा सोडून द्यावी लागते. फुटीरतावादी भावना स्वतःच्या मनातून काढून टाकावी लागते. वर्चस्ववादाचे स्वप्न दाखवणारे, कट्टरवादाच्या आधारे, फुटीरतावादाला उत्तेजन देणाऱ्या स्वार्थी आणि विद्वेषी लोकांपासून वाचवून ठेवावे लागते.
तथाकथित अल्पसंख्याक आणि अनुसूचित जाती जमातीमधील लोकांना खोटी स्वप्ने आणि काल्पनिक द्वेष पसरवून भारताच्या विविधतेच्या मूळ गाभ्यावर घाला घालून शाश्वत ऐक्य मोडून काढण्याचा घृणास्पद प्रयत्न चालू आहे. ‘भारत तुझे तुकडे होतील’ अशी घोषणा देणारी मंडळी या षडयंत्रामध्ये समाविष्ट आहे. तेही नेतृत्व करतात. राजकीय स्वार्थ, कट्टरता आणि अलगाव, भारताबद्दलचे वैमनस्य आणि जागतिक वर्चस्वाची महत्त्वाकांक्षा यांचे एक विचित्र संयोजन भारताच्या राष्ट्रीय ऐक्याविरूद्ध काम करत आहे. हे समजून घेण्यासाठी धैर्य लागेल. भडकवणाऱ्या मंडळीच्या अधीन न राहता, राज्यघटना व कायद्याचे पालन करून, अहिंसक रीतीने व जोडण्याच्या उद्देशाने आपल्या सर्वांना कार्यरत राहावे लागेल. एकमेकांच्या व्यवहाराप्रती संयमित, नियम, कायदा आणि नागरी शिस्तीच्या मर्यादेत परस्पर सद्भावपूर्वक आचरण केले तरच विश्वासाचे वातावरण तयार होते. अशा वातावरणात, थंड डोक्याने समन्वय साधून समस्या सोडविली जाते. त्याच्या विपरीत आचरणाने परस्पर अविश्वास वाढतो.अविश्वास दृष्टीक्षेपात, समस्येचे निराकरण नाहीसे होते. समस्येचे स्वरुप देखील समजणे कठीण होते. केवळ प्रतिक्रियेमुळे, विरोधामुळे, भीतीमुळे, अनियंत्रित हिंसक वर्तनास प्रोत्साहन दिले जाते, अंतर आणि विरोध वाढतच जातात.
परस्पर वागणुकीत एकमेकांशी संयमाने व धैर्यपूर्वक आचरण ठेवून आपण विश्वास व सौहार्दाला बळकटी देवून, प्रत्येकाने आपल्या सर्वांच्या अस्मितेचे सत्य स्वीकारले पाहिजे. राजकीय फायद्या-तोट्याच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची प्रवृत्ती दूर ठेवावी लागेल. भारतीय भारतापासून वेगळे राहू शकत नाही. असे सर्व प्रयोग अयशस्वी झाले आहेत, हे दृष्य आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे. हे ध्यानात घेतले पाहिजे की ‘स्व’ कल्याणाचा शहाणपणा आपल्याला एकत्व भावनेमध्ये जाण्यासाठी दिशा निर्देशन करीत आहे. भारताच्या भावनिक एकात्मतेत आणि भारताच्या विविधतेचा स्वीकार आणि सन्मानाच्या मूळामध्ये हिंदु संस्कृती, हिंदु परंपरा आणि हिंदु समाजाने स्वीकारलेली प्रवृत्ती आणि सहिष्णुता आहे हे ध्यानात घेतले पाहिजे.
‘हिंदु’ हा शब्द संघाच्या बहुतेक प्रत्येक विधानात उच्चारला जातो, पण इथे पुन्हा एकदा याची चर्चा यास्तव होत आहे कारण आजकाल काही त्याच्याशी संबंधित शब्द प्रचलित झाले आहेत. उदाहरणार्थ, स्वदेशी या शब्दाची वारंवार पुनरावृत्ती होते. त्यात जे स्वत्व आहे तेच हिंदुत्व आहे. त्या आपल्या राष्ट्रीय सनातन स्वभावाचा उद्घोष अमेरिकेच्या भूमीतून स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जगाला एक कुटुंब म्हणून बघत सर्वपंथ समन्वयाच्या रूपाने स्वीकार्यता व सहिष्णुतेच्या स्वरूपात केली होती. महाकवी श्री. रविंद्रनाथ ठाकूर यांनी याच आधारावर आपल्या स्वदेशी समाजाच्या उत्थानाची कल्पना स्पष्ट केली होती. श्री.अरविंद यांनी आपल्या उत्तरपाराच्या भाषणात देखील ही घोषणा केली होती. 1857 नंतर, आपल्या देशात समस्त आत्ममंथन, चिंतन, विचार आणि समाज जीवनातील विविध अंगांचा थेट सक्रियतेचा संपूर्ण अनुभव आपच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत तयार केला गेला आहे. आपला आत्मा हीच घोषणा करतो. त्या आपल्या आत्म्याच्या ‘स्व’ च्या आधारावर आपल्या देशाच्या बौद्धिक विचार मंथनाची दिशा, त्याद्वारे निर्मित सारासार विवेक, कृतीच्या कर्तव्याचे निकष निर्धारित केले गेले पाहिजेत. आपल्या राष्ट्रीय मनातील आकांक्षा, अपेक्षा आणि दिशानिर्देश त्याच दृष्टीने साकारल्या गेल्या पाहिजेत. आपल्या पुरुषार्थाच्या भौतिक जगात केल्या जाणाऱ्या कार्याचे उद्दिष्ट आणि परिणाम त्यास सुसंगत असले पाहिजेत. तेव्हा आणि त्यानंतरच भारत स्वावलंबी म्हटला जाईल. उत्पादनाचे स्थान, उत्पादनामध्ये गुंतलेले हात, उत्पादनांच्या देवाणघेवाणीचा आर्थिक फायदा आणि उत्पादनाचे हक्क आपल्या देशातच राहिले पाहिजेत. केवळ यामुळेच ही प्रक्रिया स्वदेशी होत नाही. विनोबा यांनी स्वदेशीला स्वावलंबन आणि अहिंसा म्हटले आहे. स्व. दत्तोपंत ठेंगडी म्हणायचे की स्वदेशी केवळ वस्तू व सेवापुरती मर्यादीत नाही. याचा अर्थ राष्ट्रीय स्वावलंबन, राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि समानतेच्या आधारावर आंतरराष्ट्रीय सहकार्याची स्थिती प्राप्त करणे होय. भविष्यात आपण स्वावलंबी होऊ शकतो, म्हणूनच आज समानतेची स्थिती आणि स्वत: च्या अटींवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहारात जर आपण कोणत्याही कंपन्यांना बोलवतो किंवा थोडीशी ढील देवून अपरिचित तंत्रज्ञान आपल्याकडे आणण्याची सोय करतो, त्यास मनाई नाही. पण हा संमतीचा निर्णय आहे.
स्वावलंबनामध्ये ‘स्व’चे अवलंबन अभिप्रेत आहे. आपल्या दृष्टीनुसार आम्ही आपले उद्दिष्ट आणि मार्ग ठरवितो. जग ज्या गोष्टींच्या मागे धावत आहे, आपण त्याच शर्यतीत सामील होऊन पहिल्या क्रमांकावर आलो तर त्यात पराक्रम आणि विजय निश्चित आहे. परंतु स्वभान आणि सहभाग नाही. उदाहरणार्थ, जर आपण कृषी धोरण निश्चित केले तर त्या धोरणासह आपला शेतकरी स्वत: चे बियाणे स्वत: तयार करण्यासाठी स्वतंत्र असला पाहिजे. आपला शेतकरी स्वत: आपली आवश्यक खते, प्रतिजैविक आणि कीटकनाशके बनवू शकेल किंवा ते सर्व त्याला त्याच्या गावाच्या आसपास मिळतील असे झाले पाहिजे. आपल्या उत्पादनास संग्रहित आणि संशोधित करण्याची कला आणि सुविधा त्याच्या जवळच उपलब्ध असावी. आपला शेतीविषयक अनुभव सखोल आणि प्राचीन आहे. म्हणूनच कालसुसंगत आणि अनुभवसिद्ध पारंपारिक ज्ञान आणि आधुनिक कृषी विज्ञान यांच्यातील उपयुक्त व परिचित असलेले घटक आपल्या शेतकऱ्यांना परिचित करून देणारी व्यवस्था देशात पाहिजे. वैज्ञानिक निरीक्षण आणि प्रयोगांना आपल्या फायद्यानुसार परिभाषित करून नीती-धोरणांना प्रभावित करून नफा कमावण्यासाठी कॉर्पोरेट जगाच्या तावडीत अडकून न पडणे, किंवा बाजाराच्या किंवा मध्यस्थांच्या जाळ्यात न अटकता आपले उत्पादन विकण्याची स्थिती तयार झाली पाहिजे. तेव्हा हे धोरण भारतीय दृष्टीचे अर्थात स्वदेशी कृषी धोरण मानले जाईल. हे काम आजच्या प्रचलित कृषी आणि आर्थिक व्यवस्थेत होणार नाही याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत, कृषी व्यवस्था आणि अर्थव्यवस्था यांना अनुकूलतेकडे घेवून जाणारी धोरणे जर बनवलीत, तर त्यास स्वदेशी धोरण म्हटले जाईल.
अर्थ, शेती, श्रम, उद्योग आणि शिक्षण धोरणात ‘स्व’ ला आणण्याच्या इच्छेने काही आशावादी पावले उचलली गेली आहेत. व्यापक संवादाच्या आधारे नवीन शिक्षण धोरण जाहीर केले गेले आहे. त्यांचे संपूर्ण शिक्षण जगात स्वागत झाले, आम्ही पण त्याचे स्वागत केले आहे. Vocal for Local ही एक देशी शक्यतांसह एक उत्तम सुरुवात आहे. परंतु या सर्वांची यशस्वी अंमलबजावणी पूर्ण होईपर्यंत बारीक लक्ष द्यावे लागेल. म्हणूनच ‘स्व’या आत्म तत्वाचा विचार व्यापक संदर्भात आत्मसात करावा लागेल, तरच योग्य दिशेला अनुसरण करून हा प्रवास यशस्वी होईल.
आपल्या भारतीय मतानुसार, संघर्षातून प्रगतीच्या घटकाचा विचार केला गेला नाही. अन्याय रोखण्याचे अंतिम साधन म्हणून संघर्षाला ओळखले जाते. विकास आणि प्रगती आपल्याकडे समन्वयाच्या आधारे विचारात घेतली गेली आहे. म्हणून प्रत्येक क्षेत्र स्वतंत्र आणि स्वावलंबी तर बनते, आत्मीय भावनेच्या आधारावर, एक राष्ट्र पुरुषाचा भाग म्हणून, परस्पर निर्भरतेने चालणारी व्यवस्था निर्माण करून, सर्वांचा लाभाने सर्वांचा आनंद साधता येतो, ही आत्मीयता आणि विश्वासाची भावना, धोरण बनवताना, सर्व संबंधित पक्ष आणि व्यक्तींशी व्यापकपणे विचार-विनिमय करण्याद्वारे परस्पर विचारमंथनातून सहमती दर्शविली जाते. त्यातून निर्माण होत असते. प्रत्येकाशी संवाद साधणे, त्याच्याशी सहमत होणे, त्याचे परिणाम सहकार्य, या प्रक्रियेमुळे विश्वास, हे आपल्या आत्मीय जणांमध्ये , समाजात यश, श्रेय इत्यादी मिळविण्याची प्रक्रिया सांगितली गेली आहे.
समानो मंत्रः समितिः समानी समानं मनः सहचित्तमेषाम् ।
समानं मंत्रमभिमंत्रये वः समानेन वो हविषा जुहोमि।।
सुदैवाने, सर्व विषयांवर प्रत्येकाच्या मनात असा विश्वास निर्माण करण्याची क्षमता आजच्या राजकीय नेतृत्त्वातून आशा आणि अपेक्षा आहे. समाज आणि शासन यांच्यातील प्रशासनाचा स्तर पुरेसा संवेदनशील आणि पारदर्शक असल्याने हे काम अधिक प्रभावीपणे केले जाऊ शकते. जेव्हा संमतीच्या आधारे घेतलेले निर्णय बदल न करता अंमलात येतात तेव्हा समन्वय आणि संमतीचे हे वातावरण दृढ होते. जाहीर केलेल्या धोरणांची अंमलबजावणी शेवटच्या स्तरावर कशी केली जात आहे, याबद्दल नेहमी जागरुकता आणि नियंत्रण असणे आवश्यक आहे. धोरणे तयार करण्यासोबतच त्यांच्या अंमलबजावणीत तत्परता आणि पारदर्शकता असेल तर आपल्याला त्यातील अपेक्षित बदलांचे पूर्ण लाभ मिळू शकतात.
कोरोनाच्या परिस्थितीत, धोरण निर्मिकांसह देशातील सर्व वैचारिक लोकांचे लक्ष, देशातील आर्थिक दृष्टीने कृषी, उत्पादनाला विकेंद्रित करणारे लघु आणि मध्यम उद्योग, रोजगार निर्मिती, स्वयंरोजगार, पर्यावरण-मैत्री आणि उत्पादनांच्या सर्व क्षेत्रांमध्ये शीघ्र आत्मनिर्भर होणाऱ्या बाबींकडे आकर्षित झाले. या क्षेत्रात काम करणारे आपले छोटे उद्योजक, शेतकरी वगैरे सर्वजण पुढे येवून या दिशेने देशासाठी यश मिळविण्यासाठी उत्सुक आहेत. मोठ्या देशांच्या बळकट आर्थिक शक्तींशी स्पर्धा करण्यासाठी सरकारला त्यांना संरक्षणात्मक कवच द्यावे लागेल. कोरोनाच्या परिस्थितीमुळे, सहा महिन्यांनंतर, त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी मदत करावी लागेल आणि मदत पोहचत आहे की नाही याची खात्री करावी लागेल.
आपल्या राष्ट्राच्या विकास आणि प्रगतीच्या संदर्भात, आपल्या भूमीच्या जाणिवावर आधारित आपल्या पार्श्वभूमीवर आपल्या विकासाचा मार्ग रचला पाहिजे. त्या मार्गाचे गंतव्यस्थान आपल्या राष्ट्रीय संस्कृती आणि आकांक्षानुसार असेल. सर्वांना सहमतीच्या प्रक्रीयेत सहभागी करावे .अचून, तातडीने आणि शक्य तितक्या निश्चितपणे जसा निर्णय होत आहे तशी योजनांची अंमलबजावणी करावी. अखेरच्या माणसापर्यंत या विकास प्रक्रियेचा फायदा पोहचेल, मध्यस्थ आणि दलालांच्या माध्यमातून लूट थांबविली जाईल आणि जनता थेट विकास प्रक्रियेत भाग घेईल आणि ती पाहू शकेल, तरच आपली स्वप्ने सत्यात उतरतील, अन्यथा ते अपूर्ण राहण्याचा धोका तसाच कायम राहील.
वरील सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत. परंतु राष्ट्रवादाच्या सर्व प्रक्रियांमध्ये समाजाची जबाबदारी मोठी आणि मूलभूत आहे. कोरोना संबंधित प्रतिक्रियेच्या स्वरुपात, जगाला ‘स्व’ चे महत्त्व, राष्ट्रीयतेचे महत्व, सांस्कृतिक मूल्ये, पर्यावरणाचा विचार आणि त्याप्रती कृतीची तत्परता, कोरोनाची स्थिती मंदावल्यावर पुन्हा समाजाचे वर्तन उल्लेखित चिरंतन महत्त्वाच्या सर्व उपयुक्त गोष्टींकडे दुर्लक्ष करणारे होऊ नये. आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा संपूर्ण समाज सतत आणि क्रमिक प्रगती करण्यासाठी सतत आपल्या आचरणाचा उपयोग करेल. आपल्या छोट्या छोट्या आचरणाच्या बाबतीत बदल घडवून आणण्याच्या क्रम बनवून, नित्य त्याविषयीचे उपक्रम राबवून आपण आपल्या सवयीतील हा बदल कायम राखून पुढे जावू शकतो. प्रत्येक कुटुंब त्याचा भाग बनू शकतो. आठवड्यातून एकदा, आपल्या कुटुंबात श्रद्धेनुसार भजन, इच्छेनुसार बनवलेले भोजन केल्यावर आम्ही दोन-तीन तास गप्पां गोष्टींसाठी बसावे. आणि त्यासंदर्भात संपूर्ण कुटुंबामध्ये या विषयांवर चर्चा करून आपल्या त्यासंबंधी कृतीचा एक छोटासा ठराव ठरवून, पुढील आठवड्याच्या गप्पांपर्यंत कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आचरणात अंमलबजावणी करू शकतो. चर्चा करणे आवश्यक आहे, कारण विषय किंवा वस्तू नवीन की जुनी आहे, तिचे नवीनपणा किंवा जुनेपणा योग्यतेने सिद्ध होत नाही. सर्वकाही तपासल्यानंतरच त्याची योग्यता आणि आवश्यकता समजली पाहिजे, अशी तऱ्हा आपल्याकडे स्पष्ट केली आहे.
संतः परीक्ष्यान्यतरद् भजन्ते मूढः परप्रत्ययनेय बुद्धिः।
कुटुंबातील अनौपचारिक चर्चेत, विषयाच्या सर्व बाबींचे ज्ञान, सारासार विचाराने त्याच्या वास्तविक आवश्यकतेचे ज्ञान अथवा ती अंगीकारण्याची किंवा सोडण्याची इच्छा असते, जर ते स्वेच्छेने समजून उमजून स्वीकारले तर तो बदल चिरंतन होतो.
सुरवातीस, आम्ही आपल्या घराची देखभाल, सजावट, आपल्या कुटुंबाचा अभिमान, आपल्या कुटुंबाची परंपरा, कुलरिती याबद्दल चर्चा करू शकतो. पर्यावरणाचा विषय सर्वस्वीकृत आणि सुपरिचित असल्याने, आपल्या घरात पाणी वाचवणे, प्लास्टिकचा पूर्णपणे त्याग, घराच्या अंगणात हिरवीगार झाडे, फुले, भांड्यात वाढणारे वृक्ष आणि वृक्षारोपण करण्याच्या कार्यक्रमापर्यंतच्या कामाची चर्चा देखील सोपी आणि प्रेरणादायक ठरू शकते. आहे. आपण सर्व जण स्वत: साठी आणि कुटुंबासाठी दररोज काही योग्य आवश्यकतेनुसार वेळ आणि पैसा खर्च करतो. दररोज समाजासाठी किती वेळ आणि किती वेळ घालवला जातो हे चर्चेनंतर काम सुरू करण्याचा विषय असू शकतो. समाजातील सर्व जाती-भाषा, प्रांत विभागातील आपले मित्र, मित्राचे कुटुंबातील सदस्य आहेत की नाहीत? मग आपले आणि त्यांचे येणे-जाणे, उठणे- बसणे, खाणे-पिणे आहे की नाही? हे सामाजिक समरसतेच्या दृष्टीने खूप महत्वाचे चिंतन कुटुंबात होवू शकते. या सर्व विषयांमध्ये, समाजातील कार्यक्रम, उपक्रम आणि प्रयत्नात आपल्या कुटुंबाचे योगदान आपल्या जागरूकता आणि आग्रहाची बाब असू शकते. रक्तदान करणे, नेत्रदान करणे इत्यादी थेट सेवा कार्यक्रम उपक्रमात भाग घेणे किंवा समाजाचे मन या कामांसाठी अनुकूल बनविणे अशा प्रकारे कुटुंबाचे योगदान दिले जावू शकते.
अशा छोट्या छोट्या उपक्रमांद्वारे, व्यक्तिगत जीवनामध्ये सद्भाव, शुद्धता, संयम, शिस्तबद्ध मूल्याधिष्ठित आचरणाचा विकास होवू शकतो. परिणामी, आपली सामुहिक वागणूक देखील नागरी शिस्तीचे अनुसरण करून परस्पर हानिरहित होवू शकते. प्रबोधनाच्या माध्यमातून समाजातील सामान्य घटकांचे मन आपल्या सहजात एकजुटीचा आधार म्हणून हिंदुत्वाला घेवून चालेल. देशासाठी आपल्या पुरुषार्थाचे आपल्या राष्ट्रीय स्वरुपातील आत्मभान समाजातील सर्व घटकांची आत्मीयतापूर्ण परस्पर निर्भरता, आपली सामूहिक शक्ती सर्व काही करू शकते, हा आत्मविश्वास. आणि आपल्या मूल्यांच्या आधारे आपल्या विकास यात्रेच्या गंतव्यस्थानांची कल्पना सतत जागृत राहत असेल, तर नजीकच्या भविष्यात भारतवर्ष अख्या जगाच्या सुख शांतीचा युगानुकूल मार्ग प्रशस्त करेल. आणि भारताला बंधुत्वाच्या आधारे मनुष्याला वास्तविक स्वातंत्र्य आणि समानता प्रदान करणारे राष्ट्र म्हणून उभे राहतांना आपण पाहू शकू.
अशा व्यक्ती आणि कुटूंबाच्या आचरणाने संपूर्ण देशभर बंधुत्व, पुरुषार्थ आणि न्यायपूर्ण व्यवहाराचे वातावरण चतुर्दिक तयार होईल. असे प्रत्यक्षात उतवणारे कार्यकर्त्यांचे देशव्यापी समूह तयार कारणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १९२५ पासून कार्यरत आहे. गट तयार करण्यासाठी कार्यरत आहे. या प्रकारची संघटित परिस्थितीच समाजाची सहज स्वाभाविक निरोगी अवस्था आहे. शतकानुशतके झालेल्या हल्ल्याच्या अंधारापासून मुक्त झालेले, या स्वतंत्र राष्ट्राच्या नवोदयासाठी पूर्वस्थिती समाजाची स्वस्थ संगटीत अवस्था आहे. हे उभे करण्यात आपल्या महापुरुषांनी प्रयत्न केलेत. स्वातंत्र्यानंतर, आम्हाला हे गंतव्य लक्षात ठेवून त्यास योग्य भाषेत परिभाषित करून त्याच्या अनुकूल नियम सांगणारे संविधान आपल्याला मिळाले. त्याला यशस्वी करण्यासाठी, संपूर्ण समाजात ही स्पष्ट दृष्टी, परस्पर समरसता, एकतेची भावना आणि देशाचे हित सर्वोपरि मानून केला जाणारा व्यवहार या संघ कार्याद्वारे निर्माण होईल. या पवित्र कार्यामध्ये, प्रामाणिकपणे, निस्वार्थ बुद्धि ने आणि तन-मन-धन अर्पित करून देशात लाखो स्वयंसेवक कार्यमग्न आहेत. तुम्हाला सुद्धा, देशाचे पुनरुज्जीवन करण्याच्या या मोहिमेच्या रथात त्यांचे सहयोगी कार्यकर्ता बनून हात लावण्याचे आवाहन करून मी माझ्या शब्दांना विराम देतो.
“प्रश्न बहुत से उत्तर एक कदम मिलाकर बढ़े अनेक।
वैभव के उत्तुंग शिखर पर सभी दिशा से चढ़े अनेक।।”

  1. ।। भारत माता की जय।।
Previous article‘कोरोनारूपी रावणाचा नाश करू या’- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ; जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा!
Next articleमहा विजयादशमी उत्सव ; शिवसेनेचा दसरा मेळावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here