बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 896 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 741 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 75 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाला मध्ये प्रयोगशाळेतील 71 व रॅपिड टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 292 तर रॅपिड टेस्टमधील 449 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 741 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मोताळा तालुका : फुली 1, बुलडाणा शहर : 10, बुलडाणा तालुका : सव 1, दे. राजा शहर : 7, दे. राजा तालुका : दे. मही 1, चिखली शहर : 7, लोणार तालुका : रायगाव 1, हिरडव 1, नांदुरा शहर : 5, मेहकर शहर : 1, मेहकर तालुका : खंडाळा 1, जळगांव जामोद शहर : 1, जळगाव जामोद तालुका : आसलगाव 1, मलकापूर तालुका : दाताळा 4, खामगाव तालुका : निमकवला 3, अटाळी 1, लोखंडा 1, खामगाव शहर: 3, सिंदखेड राजा शहर: 1, सिंदखेड राजा तालुका: सावखेड तेजन 1, हनवतखेड 1, शेलगाव राऊत 3, नांदुरा तालुका: भोटा 4, मामुलवाडी 2, काकनवाडा 1, शेगाव शहर: 7, शेगाव तालुका: गौलखेड 1, माटरगाव 1, पहूर जिरा 1, संग्रामपुर तालुका: वकाना 1, मूळ पत्ता रिसोड जि. वाशिम 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 75 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान समर्थ नगर बुलडाणा येथील 85 वर्षीय पुरुष, पुनई ता मोताळा येथील 75 वर्षीय पुरुष व टाकरखेड ता. चिखली येथील 45 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 29 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : लोणार: 6, बुलडाणा : अपंग विद्यालय 4, चिखली : 6, दे. राजा : 6, सिं. राजा: 2, नांदुरा : 2, शेगाव : 1. तसेच आजपर्यंत 37983 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 8034 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 8034 आहे. आज रोजी 727 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 37983 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 8695 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 8034 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 727 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 117 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासीउपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.