धोका कायमच; आज 118 पॉझिटिव्ह

0
273

बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 431 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 313 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 118 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 113 व रॅपिड टेस्टमधील 5 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 107 तर रॅपिड टेस्टमधील 206 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 313 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे: बुलडाणा शहर :6, बुलडाणा तालुका : अंबोडा 1, शेगाव तालुका : नागझरी 1, बोडखा 1, सावरा 1, तिंत्रव 1, कठोरा 10, मनसगाव 1, जळंब 1, शेगाव शहर : 10, मेहकर तालुका: पांगरखेड 1, हिवरा आश्रम 1, उकळी 1, मेहकर शहर : 3, खामगाव शहर : 5, खामगाव तालुका : घाटपूरी 5, उमरा अटाळी 1, हिवरखेड 3, लोणार शहर: 1, जळगाव जामोद शहर :2, चिखली शहर: 8, चिखली तालुका : सवडत 1, सवना 2, वाघापूर 1, एकलारा 1, सिंदखेड राजा तालुका : साखरखेडा 12, लिंगा 2, सिंदखेड राजा शहर :1, नांदुरा शहर :16, नांदुरा तालुका: नारखेड 3, पिंपळखुटा धांडे 3, मलकापूर शहर: 3, मोताळा शहर :1, मोताळा तालुका : सावरगाव जहा 2, पोफळी 1, धानोरा 1, धा. बढे 1, चिंचोळा 1 तसेच मूळ पत्ता रिसोड जि वाशिम येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 118 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 29 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटरनुसार आज सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : अपंग विद्यालय 5, आयुर्वेद महाविद्यालय 1, खामगाव : 1, दे. राजा :6, नांदुरा : 1, लोणार :4, जळगाव जामोद :2, चिखली :9,
तसेच आजपर्यंत 35593 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 7823 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 7823 आहे.
आज रोजी 471 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 35593 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 8303 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 7823 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 367 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 113 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Previous articleकोविड – १९ काळात निष्पक्ष,पारदर्शक व सुरक्षित निवडणुकांकरिता स्टार प्रचारकांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी
Next articleमहात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ न देणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here